Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023Saam Tv

Gauri Ganpati 2023: गौराईला तिखटाचा नैवद्य का दाखवतात माहितीये का?

Gauri Puja :गौरीसाठी तिच्या आवडीचा नैवद्य, फराळ असे अनेक पदार्थ बनवले जातात.
Published on

Ganeshotsav 2023

गणपती आल्यावर लगेचच गौराईंचेही आगमन होते. आज घरोघरी गौराईंचे आगमन होणार आहे. गौराई माहेरपणाला अनेकांच्या घरी विराजमान होणार आहे. गौराई आल्यावर तिचे लाड करण्यासाठी अनेक पदार्थ केले जातात.

गौराई माहेरपणाला अनेकांच्या घरी येतात. त्यामुळे तिच्यासाठी तिच्या आवडीचा नैवद्य, फराळ असे अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु कोकण आणि अन्य काही भागांमध्ये गौराईसाठी तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवद्य बनवला जातो. हा नैवद्य बनवण्यामागेही एक गोष्ट आहे.

Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023 : गणेशोत्सव दहा दिवस का साजरा केला जातो?जाणून घ्या

माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे, मासे, कोंबडीवडे असा नैवद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर वाईनदेखील ठेवली जाते.

तिखटाचा नैवद्य दाखवण्यामागची कथा

गौराईला तिखटाचा नैवद्य दाखवण्यामागे एक पौराणिक कथा आहे. गौराईचे शंकर भगवानसोबत लग्न झाल्यनंतर माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्यासोबत रक्षणासाठी भूतगण पाठवले. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिची आई आणि माहेरच्या माणसांनी तिचे खूप लाड केले.

गौराईसाठी गोडाचा नैवद्य केला. तिचा चांगला पाहुणचार केला. परंतु तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले. परंतु गौराईच्या हे लक्षात होते. शंकराच्या भूतगणांना स्मशानात राहायची सवय होती. त्यामुळे त्यांना मांस खायची सवय असे. त्यांचा विचार करुन गौराईने त्यांच्यासाठी मासांहाराची व्यवस्था करण्यास सांगितले.

तेव्हापासून गौराई घरी आल्यावर भूतगण घरी येतात असे मानतात. त्यामुळे गौरी घरी आल्यावर मांसाहाराची नैवद्य देवीला दाखवला जात नाही तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.

Ganesh Festival 2023
Gauri Pujan Recipe 2023 : लाडक्या गौराईसाठी बनवा टम्म फुगेल अशी खवा पोळी, तोंडात टाकताच विरघळेल; पाहा स्पेशल रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com