Gauri Pujan Recipe 2023 : लाडक्या गौराईसाठी बनवा टम्म फुगेल अशी खवा पोळी, तोंडात टाकताच विरघळेल; पाहा स्पेशल रेसिपी
गौराईसाठी बनवा खवा पोळी
आज लाडक्या गौराईचे आगमन घरोघरी होईल. उद्या तिची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाईल. या काळात गौराईला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरवाशीन आलेल्या गौराईला अनेक पदार्थ खाऊ घालतात.
२२ सप्टेंबरला ज्येष्ठागौरी पूजन केले जाईल. यानिमित्ताने जर तुम्ही देखील गौराईसाठी नैवेद्य बनवण्याच्या बेतात असाल तर खवा पोळी बनवू शकता. बरेचदा पोळी बनवताना ती फुटते किंवा मऊ बनत नाही. यामुळे आपण ती बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. युट्यूबर 'सरिता किचन'ने सोप्या ट्रिकने बनवलेली पोळी पाहाच
1. साहित्य | Ingredients -
गव्हाचे पीठ ४०० ग्रॅम्स / ४ वाट्या | Wheat Flour 500 Grams / 4 Cups
मीठ चवीनुसार | Salt
तेल गरजेप्रमाणे | Oil
3. पद्धत
कणिक बनवण्यासाठी -
एका परात / प्लेटमध्ये गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ घ्या आणि चांगले मिसळा.
मऊ पीठ मळून घ्या, थोडे तेल (Oil) लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा.
स्टफिंगसाठी -
कढई गरम करून त्यात खवा घालून एक मिनिट मंद आचेवर परतावे.
नंतर साखर घाला आणि साखर वितळण्यासाठी मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या.
आता मिश्रण सुमारे 9-10 मिनिटे परतून घ्या, तुम्हाला रंगात थोडासा बदल दिसेल आणि मिश्रण घट्ट होईल.
गॅस बंद करा, त्यात वेलची घाला आणि चांगले मिसळा.
मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर कणकेचे छोटे गोळे करून कोरड्या पिठात घाला.
त्यात थोडे सारण टाका आणि पोळी लाटून घ्या. पोळी मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्या, भाजताना थोडं तूप लावा. स्वादिष्ट खवा पोळी तयार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.