राज्यात ७ सप्टेंबर रोजी बाप्पा सर्वांच्या घरोघरी विराजमान झाला. घरोघरी बाप्पा आल्यानंतर आज दीड दिवसांच्या या गणरायाचे विसर्जन आहे. बाप्पाचे विसर्जन असल्याने सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू दाटून येतात. मन हळवं होतं आणि बाप्पा जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. अशात सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात विसर्जनानिमित्त अनेक शुभेच्छा आणि व्हॉट्सअॅप स्टेटस तसेच पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यापैकी आम्ही खास तुमच्यासाठी काही कोट्स आणि शुभेच्छा निवडल्या आहेत. तुमच्या मित्र मैत्रिणींसह अन्य नातेवाईकांना तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकता.
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
बाप्पाच्या दर्शनाने सर्व काही मिळाले
येण्याने तुझ्या झाला हर्षोल्हास अशीच कृपा तुझी राहू दे
गणेश विसर्जनाच्या खास शुभेच्छा!
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया
ढोलताशाच्या नादात गुलाल रंगला
वाजत गाजत नेऊ आपल्या बाप्पााला
गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा!
घर भरलं आनंदानी आणि समृद्धीने
पुढल्या वर्षी सुद्धा वाजत गाजत लवकर या
गणपती बाप्पा मोरया!
ज्या धुमधडाक्यात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं
तितक्याच जल्लोषात त्याचं विसर्जन करणार
गणपती विसर्जनाच्या शुभेच्छा!
आभाळ भरलं होतं गणराया तू येताना
आता डोळ्यांत आसवं दाटली तू जाताना
चुक भूल पदरात घे अन् पुढल्या वर्षी लवकर ये
डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू
आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही
गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा!
सेवा जाणुनी, गोड मानुनी,
द्यावा आशीर्वाद आता, निरोप घेतायत बाप्पा
पुढल्या वर्षी लवकर या!
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!
विसर्जनच्या दिवशी बाप्पा घरातून जाताना
सर्व वाईट शक्ती आणि दु:ख वेदना निघून जावो
हिच आमची मंगलमूर्ती चरणी प्रार्थना!
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.