Ganesh Chaturthi Shubha Muhurta 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2023 Puja: गजानना, गजानना..., श्रीगणेशाची प्रतिष्ठापना कशी कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

Ganesh Chaturthi Shubha Time : लाडक्या गणरायाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करणार असाल तर शुभ मुहूर्त पाहा.

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi Date And Time :

घरोघरी आणि मोठ मोठ्या मंडळात गणरायाच्या आगमनाची तयारी झालीच असेल. सध्या सर्वत्र गणेशभक्तांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.

यंदा ही चतुर्थी १९ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. प्रत्येक मंगलकार्यात किंवा शुभ प्रसंगी विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. घरात सुख-समृद्धी आणि अनेक संकटांवर मात करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने गणेशाची आराधना केली जाते. जर तुम्ही देखील लाडक्या गणरायाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करणार असाल तर शुभ मुहूर्त पाहा.

1. गणेश चतुर्थी वेळ - शुभ मुहूर्त

हिंदू पंचागानुसार चतुर्थीची वेळ (Time) ही १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २.०९ वाजता सुरु होईल तर ती १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. यंदा ही चतुर्थी मंगळवारी आल्याने महा-चतुर्थी समजली जात आहे.

गणपती (Ganapti) स्थापनेसाठी चौरंग किंवा पाट, नारळ, आंब्याची डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला कलश, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, नाडाबंडल, देठाची पाने, पत्री, सिंदूर,फळे, मिठाई, मोदक, गोड पदार्थ, छोटी गणेशाची मूर्ती आदी

3. पूजा पद्धत

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करुन त्यावर पाट ठेवा. अक्षता पसरवा, नंतर मूर्ती स्थापन करावी. मूर्तीच्या बाजूला कलश स्थापना करा. मूर्ती आसनावर द्विराचमन, प्राणायामादी केल्यावर 'श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये' असा मनात संकल्प करुन पाणी सोडा. त्यानंतर कलश, शंख, घंटा आणि दीप यांना गंधअक्षचा-पुष्प अर्पण करावे. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा आणि मूर्तीच्या हृदयाला आपला उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करावा. पुढील मंत्र म्हणावा.

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।

अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।। १ ।।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

Goddess Idol Conversion: मुंबईत देवी-देवतांचं धर्मांतर; काली माता बनली 'मदर मेरी'

SCROLL FOR NEXT