Urine Problem SAAM TV
लाईफस्टाईल

Frequent Urination: आरोग्याचा इशारा! ही सात लक्षणे टाळू नका, योग्य तपासणी लगेचच करा

Health Tips : वारंवार लघवी होणे ही केवळ साधी समस्या नसून गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. यामागील कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

बर्‍याचदा लोकांना वारंवार लघवी होण्याची समस्या जाणवते. वैद्यकीय भाषेत याला ‘फ्रिक्वेंट युरिनेशन’ असे म्हणतात. काहीवेळा जास्त पाणी पिणे किंवा औषधांचा दुष्परिणामामुळे हा परिणाम जाणवतो. मात्र ही समस्या सतत राहिली तर ती गंभीर आजाराचे लक्षणही ठरू शकते. यामुळे ऑफिसमध्ये काम करताना त्रास होतो, झोपेवर परिणाम होतो. काही जण या भीतीने पाणी पिणे टाळतात आणि त्यामुळे डिहायड्रेशनसारख्या समस्या निर्माण होतात.

तज्ञांच्या मते, वारंवार लघवी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास मूत्रपिंड अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकतात. त्यामुळे लघवीची वारंवारता वाढते. अतिक्रियाशील मूत्राशय हीदेखील एक अवस्था आहे ज्यात मूत्राशय पूर्ण न भरताही लघवीची तीव्र इच्छा होते. काहीवेळा कॅफिन, अल्कोहोल किंवा खूप द्रवपदार्थ प्यायल्यामुळे ही समस्या उद्भवते. महिलांमध्ये गर्भधारणेदरम्यान गर्भाशयाचा दबाव मूत्राशयावर येतो ज्यामुळे लघवी वाढते.

मूत्रमार्गाचा संसर्ग UTI किंवा मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यास देखील लघवीची वारंवारता वाढते. अशावेळी जळजळ, ताप, पाठदुखी आणि मळमळ यासारख्या लक्षणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. पुरुषांमध्ये वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी किंवा मूत्राशयातील दगड-गाठी देखील कारण ठरू शकतात. एवढेच नव्हे तर ताण-तणाव आणि चिंता यामुळेही स्नायू आकुंचन पावून वारंवार लघवी होऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात की, ही समस्या सातत्याने होत असेल तर ती केवळ सामान्य नाही तर गंभीर आरोग्य समस्येचे संकेत असू शकतात. त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती तपासणी व उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT