Sakshi Sunil Jadhav
सीरम कोलेस्ट्रॉल ही एक महत्वाची चाचणी आहे असे तज्ज्ञ म्हणतात.
सीरम कोलेस्ट्रॉल चाचणीमध्ये तुम्हाला रक्ताची चाचणी करावी लागते. त्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कळते.
हदयाचे आरोग्य, रक्तप्रवाह आणि शरीराचे कार्य समजून घेणे यामध्ये महत्वाचे मानले जाते.
कोलेस्ट्रोल हा मेणासारखा पदार्थ असतो. लिव्हरच्या पेशी तयार करण्याचे काम हा पदार्थ करत असतो.
शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण संतुलित करणे खूप महत्वाचे आहे. जर खराब कोलेस्ट्रोल वाढले तर ह्दयरोगाचा धोका अनेक पटीने वाढू शकतो.
जर शरीरात चांगले कोलेस्ट्रोल योग्य पातळीवर असेल तर वाईट कोलेस्ट्रोल कमी असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही.
कोलेस्ट्रोलच्या मदतीने शरीरात अनेक महत्वाची कार्य केली जातात. जसे की हार्मोन्सची निर्मिती व्हिटॅमिन डीचे शोषण आणि पित्त रस तयार होतो.
जर शरीरातील सीरम कोलेस्ट्रॉल वाढले तर हदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा धमन्यांच्या तक्रारी वाढू शकतात.