Silent Heart Attack google
लाईफस्टाईल

Silent Heart Attack: वारंवार ढेकर येतायेत, पोट फुगल्यासारखं वाटतंय? सावधान! हे गॅस नव्हे तर 'हार्टअटॅक'चे असू शकते लक्षण

Gas Vs Heart Attack: वारंवार ढेकर, छातीत जडपणा किंवा पोट फुगल्यासारखं वाटतंय? हे फक्त गॅस नसून “सायलेंट हार्ट अटॅक”चं संकेत असू शकतात. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

वारंवार ढेकर, छातीत जडपणा आणि पोट फुगणं ही लक्षणं गॅस नव्हे तर हार्ट अटॅकची असू शकतात.

महिलांमध्ये लक्षणं सौम्य स्वरूपात दिसतात.

डायबिटीज आणि उच्च रक्तदाब असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

वेळेत तपासणी आणि उपचार घ्यावेत.

छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं या समस्या अनेकदा जाणवतात. म्हणून आपण त्यांना सहज दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं, हा फक्त गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे. मात्र डॉक्टरांच्या मते ही लक्षणं कधी कधी 'सायलेंट हार्ट अटॅक'चीही सुरुवाची लक्षणे असू शकतात.

दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवीन भामरी यांनी सांगितलं की, भारतामध्ये अनेक लोक छातीत किंवा वरच्या पोटात जाणवणारा दाब, जडपणा किंवा अस्वस्थता याला अपचन समजतात. पण काहीवेळा हीच लक्षणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशा वेळी नेहमीसारखा जास्त छातीत दुखणं जाणवत नाही, त्यामुळे रुग्णांना ही गंभीर स्थिती ओळखता येत नाही.

जर तुम्हाला वारंवार छातीत कळा, वारंवार ढेकर, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा घशात जळजळ जाणवत असेल आणि हे लक्षणे पुन्हा पुन्हा होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे 'सायलेंट' हार्ट अटॅकचे संकेत असू शकते. म्हणजे असा अटॅक जो वेदनेशिवाय वाढत जातो आणि गंभीर रुप धारण करतो. वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकाळ उच्च रक्तदाब असलेले लोक या गटात येतात.

तज्ज्ञ सांगतात, हार्टबर्न आणि हार्ट अटॅकमध्ये फरक करणे काहीवेळा डॉक्टरांसाठीही कठीण ठरतं. दोन्ही आजारांमध्ये छातीत कळा, जळजळ किंवा ताण जाणवतो. जर ही वेदना जेवल्यानंतर किंवा झोपताना होते आणि अँटासिड घेतल्यावर कमी होते, तर ती बहुधा गॅसची असते. पण छातीत बराचवेळ अस्वस्थता, ताण किंवा जळजळ वाटत असेल आणि कारण समजत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं अनेकदा खुप हलकी सौम्य स्वरूपाची दिसतात. जसं की थकवा, मळमळ, पोटदुखी, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता. कधी कधी ही वेदना हात, मान, तोंड किंवा पाठीकडेही पसरतात. तसेच श्वास घ्यायला त्रास, घाम येणे, किंवा चक्कर येणे ही देखील धोक्याची चिन्हं असू शकतात.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

ज्यामध्ये जास्त वेदना नसतात पण हृदयावर परिणाम होतो. रुग्णाला तो ओळखता येत नाही म्हणून याला सायलेंट म्हटलं जातं.

गॅस आणि सायलेंट हार्ट अटॅकमध्ये फरक कसा ओळखायचा?

जर छातीत जळजळ अँटासिड घेतल्यावर कमी होत असेल तर गॅस असू शकतो. पण अस्वस्थता, दाब, थकवा किंवा श्वास घेताना त्रास असेल तर हार्ट अटॅकचा इशारा आहे.

कोणत्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो?

वृद्ध, उच्च रक्तदाब, डायबिटीज किंवा हृदयविकाराच्या जेनेटिक समस्या असलेल्या लोकांना धोका जास्त असतो.

लक्षणं दिसल्यास काय करावं?

त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ECG, ईको किंवा इतर हृदय तपासण्या करून खात्री करून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT