Liver Heat Symptoms: तोंडाची आग, जळजळ होतेय; लक्षणे दूर्लक्ष करु नका, असू शकतो लिव्हरचा धोका

Oral Care: तोंडाची जळजळ, व्रण किंवा कोरडेपणा जाणवत असेल तर लिव्हरमध्ये उष्णता वाढली असण्याची शक्यता असते. कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या आणि लिव्हर निरोगी ठेवा.
mouth burning causes
liver heat symptomssaam tv
Published On
Summary

लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यास तोंडात व्रण, जळजळ आणि कोरडेपणा दिसतो.

तेलकट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ लिव्हरच्या कार्यावर परिणाम करतात.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.

Summary

लिव्हर हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करणे, पचनक्रिया सुधारणे, हार्मोन्स नियंत्रित ठेवणे आणि ऊर्जा साठवणे अशी ५०० हून अधिक कार्ये करतो. मात्र, जेव्हा लिव्हरमध्ये उष्णता वाढते, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या तोंडावर आणि पचनसंस्थेवर दिसू शकतो.

लिव्हरची लक्षणे

अयोग्य आहार, तळलेले आणि जंक फूड, जास्त मद्यपान, अपुरी झोप आणि ताण या कारणांमुळे लिव्हरचे कार्य बिघडते. यामुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस किंवा लिव्हरमधील उष्णता वाढण्याच्या समस्या उद्भवतात. या वाढलेल्या उष्णतेमुळे तोंडात वारंवार व्रण येतात, जीभ जळजळणे, तोंड कोरडं होतं, चवीमध्ये बदल होतात, त्वचेवर पुरळ किंवा खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात.

mouth burning causes
WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, दीर्घकाळ लिव्हरच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये तोंडातील आरोग्यावर त्याचे परिणाम दिसतात. लिव्हरमधील उष्णतेमुळे तोंडातील अल्सर, जिभेवर लाल किंवा पांढरे डाग, दात खराब होणे आणि पेरिओडोंटायटीससारख्या समस्या निर्माण होतात. तोंड, आतडे आणि लिव्हर हे एकमेकांशी संबंधित प्रणालीने जोडलेले आहेत. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखल्यास लिव्हरचे आरोग्यही सुधारते.

जर तुमचे लिव्हर फॅटी असेल तर त्याचा थेट परिणाम तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा ब्रश आणि फ्लॉस करून दात स्वच्छ ठेवा. तसेच, वेळोवेळी डेंटीस्टचा सल्ला घ्या, जेणेकरून कोणत्याही समस्या वेळेवर ओळखता येतील.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आणि तोंडातील अल्सरपासून बचाव करण्यासाठी आहारात ताज्या फळांचा, हिरव्या भाज्यांचा आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. तळलेले, मसालेदार आणि जंक फूड टाळा. दिवसातून पुरेसे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे तोंडातील कोरडेपणा आणि बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते.

mouth burning causes
Relationship Tips: संशय अन्...; 'या' ३ चुका वेळीच टाळा, नाहीतर नात्यात येईल दुरावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com