प्रत्येक तरुणीला मेकअप लागतोच. आता अगदी शाळेत शिकणाऱ्या मुली देखील मेकअप करतात. मेकअप करण्यासाठी विविध प्रोडक्ट वापरले जातात. त्यामध्ये काजळ, पावडर, मस्कारा यासह मॉश्चराइजर, फाउंडेशन सुद्धा असतं. त्याचा वापर करून मुली मेकअप पूर्ण करतात. बाजारात आपल्या स्किन टोननुसार विविध क्रिम बेस फाउंटेशन उपलब्ध आहेत.
फाउंडेशनचे वेगवेळे ब्रँड सुद्धा आहेत. फाउंडेशन स्किनवर अप्लाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, डार्कसर्कल हाइड होतात. मात्र अनेक व्यक्तींना बाहेर मिळणारं फाउंडेशन सूट होत नाही. त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी फाउंडेशन साध्या पद्धतीने घरच्याघरी कसं तयार करायचं याची माहिती शोधली आहे.
साहित्य
टॅल्कम पावडर
कोको पावडर
मॉश्चराइजर
कृती
फाउंडेशन बनवताना सर्वात आधी एक काचेची वाटी घ्या. यामध्ये तुम्ही जॉन्सन बेबी किंवा तुम्हाला आवडेल ती पावडर घ्या. त्यानंतर या पावडरमध्ये कोको पावडर मिक्स करा. पुढे यात मॉश्चराइजर मिक्स करा. मॉश्चराइजर मिक्स केल्यावर सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. अशा पद्धतीने सिंपल वे मध्ये तुमचं फाउंडेशन तयार आहे.
जर तुम्ही थिक मॉश्चराइजर वापरत असाल तर त्या ऐवजी निव्हिया सॉफ्ट क्रिम किंवा मग गुलाब पाणी वापरा. याने देखील स्किन मुलायम राहते आणि फाउंडेशन सहज अप्लाय करता येतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा साध्या पद्धतीने घरीच असं फाउंडेशन बनवू शकता. हे फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी तुम्ही ब्रश किंवा ब्लेंडरचा वापर करू शकता.
फाउंडेशनसाठी कोकोपावडर घेताना आधी तुमची स्किन टोन चेक करा. स्किन टोन कशी आहे त्यानुसारच स्वत: हे फाउंडेशन बनवा. जर तुमची त्वचा गोरी असेल तर अगदी थोडीशी कोकोपावडर मिक्स करा. हेच जर तुमची त्वाचा काळी असेल तर थोडं जास्त प्रमाणात कोकोपावडर घ्या.
घरच्याघरी तयार केलेलं हे फाउंडेशन जास्त वेळ टिकावं, चांगलं रहावं यासाठी ते एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. ज्या बाउलमध्ये तुम्ही फाउंडेशन बनवलं आहे त्यामध्येच ते ठेवू नका. कारण हवेने तुमचं फाउंडेशन सुकून जाईल आणि ते पुन्हा चेहऱ्यावर अप्लाय करता येणार नाही.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. आम्ही याचा दावा करत नाही, तुम्ही ब्युटी एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.