Manasvi Choudhary
अनेकजण वजन कमी करण्यासाठी जिम लावतात किंवा डाएट फॉलो करतात. पण तुम्हाला माहितीये का तुमच्या स्वयंपाकघरातच वजन कमी करण्याचं उपाय आहे.
स्वयंपाकघरातील हेल्दी ड्रिंक प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होईल. ते ड्रिंक कोणतं? कसं बनवायचं? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी तुम्ही ओवा, बडीशेप, मेथीचे दाणे, आले आणि पाणी हे साहित्य घ्यायचे आहे.
गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. नंतर त्यात ओवा, बडीशेप, मेथीचे पाणी आणि किसलेले आले मिक्स करा.
हे सर्व साहित्य मिक्स केलेले पाणी उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करा.
एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यात लिंबाचा रस मिक्स करा. नियमितपणे हे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितासाठी योग्य सल्ला घ्या.