Food Poisoning  Saam TV
लाईफस्टाईल

Food Poisoning : उन्हाळ्यात Food Poisoning का होते? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Food Poisoning in Summer : मोठ्याप्रमाणात फूड पॉइजनिंगचा समावेश असतो. तसेच हा कडक उन्हाळा जुलाब, उलट्या, डोकेदुखी, डिहाइड्रेशन, उष्माघात अशा असंख्याही समस्या घेऊन येतो.

Ruchika Jadhav

उन्हाळा म्हटलं की घामाने त्रस्त होणे आणि भर उन्हामध्ये कामासाठी बाहेर फिरणे या गोष्टी येतात. उन्हामुळे माणसाला विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये मोठ्याप्रमाणात फूड पॉइजनिंगचा समावेश असतो. तसेच हा कडक उन्हाळा जुलाब, उलट्या, डोकेदुखी, डिहाइड्रेशन, उष्माघात अशा असंख्याही समस्या घेऊन येतो.

फूड पॉइजनिंग होण्यासाठी कोणते बॅक्टेरिया जबाबदार?

फूड पॉइजनिंगमध्ये बहुतेक वेळा स्टॅफिलोकोकस किंवा ई. कोलाय बॅक्टेरियाचा संसर्ग आढळतो. या बॅक्टेरियाचा परिणाम शरीराच्या विविध भागांवर होतो. यामध्ये पोट, किडनी, मज्जासंस्था यांचा विशेष समावेश आहे.

फूड पॉइजनिंगची कारणे

पिकांच्या वाढीसाठी दूषित पाण्याचा वापर करणे.

खाण्याची भांडी स्वच्छ नसणे.

शौचालयावरून आल्यावर हात स्वच्छ न धुवणे.

दुग्धजन्य पदार्थांना सामान्य तापमानावर ठेवणे.

फ्रोजन पदार्थ नीट न ठेवणे

भाज्या आणि फळे न धुवता खाणे.

मांसाहारी पदार्थांना योग्यरित्या न शिजवणे.

जेवणासाठी स्वच्छ पाणी न वापरणे.

घाईघाईत पदार्थ खाणे.

बाहेरचे खराब अन्न खाणे.

फूड पॉइजनिंगची लक्षणे

सतत उलट्या होणे

पोटात असाहाय्य वेदना होणे.

डायरियाचा त्रास उद्धवणे

सतत डोके दुखी होणे

चक्कर येणे

तापासह थंडी वाजणे

डोळ्यांपुढे अंधारी येणे आणि डोळ्यांची जळजळ होणे.

डिहाइड्रेशन आणि अशक्तपणा जाणवणे

फूड पॉइजनिंग कसे टाळावे?

रोज जास्तीत जास्त पाणी पिणे, ज्यामुळे डिहाइड्रेशन होणार नाही.

शरीराला एनर्जी देणारे पेय पियावे. उदा. ओ.आर.एस, लिंबूपाणी

तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

शिजवलेले अन्न पदार्थ जास्त काळ उघडे न ठेवतात लवकर खावे.

बाहेरचे जंक फूड खाणे टाळा.

प्लास्टिक बॅगमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT