Food Poisoning: मोठी बातमी! मध्यान्न भोजनातून १६ शाळकरी मुलांना विषबाधा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

Mumbai News: आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मिडडे मिलमुळे शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Food Poisoning
Food PoisoningSaamtv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी

Chembur Food Poisoning:

चेंबूरमधून एक मोठी बातमी. चेंबूरच्या आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मिडडे मिलमुळे शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत देण्यात आलेली डाळ आणि खिचडी खाऊन १६ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेंबूरच्या (Chembur) आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मध्यान्न भोजनातून शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणामध्ये मुलांना डाळ आणि खिचडी देण्यात आली होती.

ज्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ सुरू झाली. त्रास जाणवू लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Food Poisoning
Pandharpur News : श्रद्धेचा झरा... शेती विकून विठुरायाला 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, रुक्मिणीस दोन तोळ्याचे मंगळसूत्र

डॉक्टरांच्या माहितीनुसार, एकूण १८० मुलांना हे मध्यान्न भोजन देण्यात आले होते. यामधील सहावी आणि सातवीतील १६ मुलांना त्रास होऊ लागला. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत एक्सरेही काढण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Latest Marathi News)

Food Poisoning
Maharashtra Politics: भाजप आमदाराच्या जिवाला धोका; भरसभेत स्वत:च व्यक्त केली भीती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com