राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं. मी आरक्षण मिळवून देण्यासाठी सतत धडपड करतोय त्यामुळे त्यांना हे बघवत नाही. माझ्या जिवाला धोका आहे कारण आपल्या समाजाचा आवाज जर एकत्र झाला तर काहींना राजकारण करणं अवघड जाईल, असं खळबळजनक वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं आहे. (Latest Marathi News)
आपल्या जिवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय वर्तृळात मोठी खळबळ उडालीये. धनगर यात्रे निमित्त गोपिचंद पडळकर सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज बीडमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना पडळकरांनी शरद पवारांनवर टीकास्त्र सोडलं.
"लेक आणि नातू म्हणतो, धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. तर आजोबा आदिवासी समाजात जाऊन म्हणतात, आदिवासींच्या आरक्षणात कुणाला घुसू देणार नाही. हे बरोबर आहे का? हे विरोधाभासी आहे असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर निषाणा साधलाय.
कधीही हल्ला होण्याची भीती
राज्यात सध्या मराठा आणि धणगर आरक्षाचा मुद्दा मोठ्या चर्चेत आहे. जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भूजबळ यांच्यात खडाजंगी सुरू आहे. यासह आता गोपीचंद पडळकर यांनी थेट पवारांवर हल्लाबोल केलाय. आपल्या जीवालाही धोका असल्याचं पडळकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
काही नराधम मागासवर्गीय बहिणींचा छळ करतात त्यांना घृणास्पद वागणूक देतात. त्यामुळे बापू बिरू वाटेगावकरांना हातात कुऱ्हाड घ्यावी लागली. मी आधी धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहे. आधी समाज आहे आणि नंतर पक्ष आहे, असं पडळकांनी ठामपणे सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, अहिल्यादेवी यांच्यासोबत घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावा. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की, जो समाज आपली ओळख विसरतो तो नव्याने इतिहास घडवू शकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.