Relationship Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : 'या' सवयीने तुमच्या नात्यात सुद्धा येईल मधासारखा गोडवा; खरं प्रेम करत असाल तर नक्की ट्राय करा

Ruchika Jadhav

कोणतंही नातं टिकवणे आणि शेवटपर्यंत एकमेंकांना साथ देणे तितकसं सोप्पं नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये दोघांचे विचार वेगळे अतात. तसेच कोणतीही व्यक्ती स्वत: परफेक्ट नसते. त्यामुळे दोघांमध्ये जितकं प्रेम असतं तितकीच भांडणं सुद्धा होतात. त्याने खरंतर नात्यातलं प्रेम आणखी वाढतं. मात्र जर भांडणं जास्तप्रमाणात वाढली तर गोष्ट बिघडू शकते. त्यामुळे वेळीच नातं सावरणं गरजेचं असतं.

भांडणं जास्त वाढत असतील आणि तुम्हाला तुमचं नातं महत्वाचं असेल तर काहीवेळी आपली चूक नसतानाही आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. नात्यात एक व्यक्ती गरम डोक्याचा असेल तर दुसऱ्याने आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. नाहीतर ते नातं तुटून जातं.

संवाद साधा

भांडण झाल्यावर दोघांच्या मनात सुद्धा एक प्रकारचा इगो निर्माण होतो. मात्र अशावेळी डोकं शांत झाल्यावर दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. एकमेकांशी बातचीत केली पाहिजे. संवाद साधल्याने, शाततेने आपले विचार समोरच्याला सांगितल्याने अनेक विषय सुटतात. अडचणी दूर होतात आणि आपला वाद सुद्धा होत नाही.

कॉलिटी टाइम एकत्र घालवा

नात्यात कायम प्रेम बहरलेलं रहावं यासाठी कॉलिटी टाइम जगणं सुद्धा महत्वाचं असतं. त्यासाठी एकत्र एखादा सिनेमा पाहा. एकत्र डान्स करा किंवा एकत्र एखादं सुंदर गाणं गा, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही एकमेकांसोबत कॉलिटी टाइम घालवू शकता.

आभार व्यक्त करा

नात्यात जेव्हा पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकत्र राहतात तेव्हा प्रत्येक कामासाठी आपल्या पार्टनरचे आभार व्यक्त केले पाहिजेत. अनेक ठिकाणी पत्नी पतीची विविध कामे काहीही तक्रार न करता पूर्ण करते. त्यावेळी पतीने कायम आपल्या पत्नीने आपल्याला केलेल्या मदतीचे आभार मानले पाहिजे. तर पती देखील घरात विविध कामे करतात, तेव्हा पत्नीने देखील पतीचे आभार मानायला हवेत.

सपोर्ट करा

प्रत्येक नात्यात दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. सर्व कामे वाटून घेतली पाहिजे. पती-पत्नी दोघंही कामाला जात असतील तर त्यांनी सर्व कामे वाटून घ्यायला हवीत. त्यामुळे दोघांना समान श्रम आणि समान आराम मिळतो. तसेच एकमेकांना कामात किंवा काही निर्णय घेण्यात सपोर्ट केल्याने नातं आणखी घट्ट होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT