Negative Thoughts  Canva
लाईफस्टाईल

Negative Thoughts : नकारात्मक विचारांनी डोकं होतं खराब? 'या' ६ उपायांनी नैराश्य जाईल दूर

Negative Thinking: आयुष्यात खूप मानसिक ताण आहे? त्यामुळे मनात सतत नकारात्मक विचार येत आहेत? पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही आहे? तर यासाठी काही खास टिप्स.

Aarti Ingle

नकारात्मक विचार का येतात?

कामाचा ताण, चिडचिड, चिंता, नात्यातील कटुता इत्यादी गोष्टींमुळे मनात नकारात्मक विचार येतात. प्रत्येकवेळी दु:ख नीट हाताळता येत नाही त्यामुळे बरेचदा आपल्याला नकारात्मक विचारांचा समाना करावा लागतो. मात्र सतत नकारात्मक विचार केला तर मानसिक आरोग्याला घातक आहे.

1. पॉझिटिव्ह राहण्यासाठी दुःखी होण्याऐवजी हसायला शिका. हसण्याने नकारात्मक विचार दूर होतात. सकाळी लवकर उठा आणि पाच मिनिटे जोरात हसा. 'लाफ्टर थेरपी' तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर करेल. हसण्यासाठी तुमच्या आयुष्यातले चांगले क्षण आठवा, तसेच एखादा कॉमेडी सिनेमा पाहा. सोशल मिडीयावर फनी व्हिडीओ बघा ज्यामुळे तुमचा मुड चांगला होईल.

2. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह विचारांच्या लोकांसोबत रहा. आनंदी स्वभावाच्या आणि सकारात्मक विचारांच्या लोकांसोबतच वेळ घालवा. तसेच नकारात्मकता पसरवत असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा. शक्यतो गॉसिप्स करणाऱ्या लोकांना दूर ठेवा.

3. मनातील निगेटिव्ह विचार नियंत्रित ठेवण्यासाठी शांत आणि आरामदायी संगीत ऐका. गाणी ऐकून मन शांत राहते. अस्वस्थ वाटल्यास अश्या गोष्टी करा ज्या तुम्हांला मनापासून आवडतात आणि आंनद देतात.

4. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमच्यामध्ये अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहते. हे टाळण्यासाठी प्रेरणादायी पुस्तके वाचायला सुरुवात करा. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होतो.

5. निगेटिव्ह वाटल्यास योगा केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. योगा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी योग आणि ध्यान अत्यंत प्रभावीपणे काम करते.

6. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी व्यस्त राहणे महत्त्वाचे आहे. विविध गोष्टींमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवा त्यामुळे नैराश्याची भावना कमी होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा त्यामुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल.

आयुष्यात कोणतीही वेळ ही कायमस्वरुपी राहत नाही. वेळ ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या ह्या एक ना एक दिवस संपणारच आहेत. त्यामुळे खचून जाता हा दिवसही जाणार आहे आणि नवीन उर्जादायी, आनंदी दिवस येईल या विचाराने जगा. त्यामुळे तुमच्यात एक वेगळ्या प्रकारचा पॉझिटिव्हनेस येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT