Cloudy Urine Causes saam tv
लाईफस्टाईल

Kidney Failure Risk: लघवी करताना फेस येतोय? वेळीच व्हा सावध किडनी निकामी झाल्याचे असू शकतं लक्षण

Foamy Urine: लघवीत फेस दिसत असेल, तर ते मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रारंभीचे लक्षण असू शकते. वेळीच निदान आणि काळजी घेतल्यास गंभीर नुकसान टाळता येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किडनी निकामी झाल्याची लक्षणे वेळेवर ओळखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. किडनी हा आपल्या शरीरातील एक खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्याचे कार्य रक्त शुद्ध करणं, शरीरातील द्रव संतुलन राखणं आणि शरीरातील कचरा बाहेर टाकणं यासारखी जबाबदारी पार पाडण्याची कार्य आहेत. पण आपण या अवयवांकडे दुर्लक्ष केलं, तर ते हळूहळू निकामी होऊ शकतात आणि शरीरातील इतर अनेक कार्यांवर त्याचा गंभीर परिणाम होतो.

क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, किडनीच्या नुकसानीची काही सुरुवातीची लक्षणं अशी असतात की, ती झोपतानासुद्धा जाणवू शकतात. सगळ्यात पहिलं, लघवीत फेस येणं हे एक महत्त्वाचं संकेत आहे. याचा अर्थ लघवीत जास्त प्रमाणात प्रथिने बाहेर पडत आहेत. हे प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्याने रक्तातील प्रथिनांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे शरीरात सूज येऊ शकते.

त्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवणं ही सामान्य लक्षणे आहेत. शरीरात उर्जेचा आणि प्रथिने निर्माण झाल्याने व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. भूक कमी लागणं आणि चेहरा, पाय किंवा डोळ्यांभोवती सूज येणं ही देखील मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची चिन्हे आहेत. याशिवाय, लघवी कमी होणं, रक्तदाब अचानक वाढणं किंवा लघवीत रक्त दिसणं ही गंभीर लक्षणे आहेत. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास मूत्रपिंडाच्या मोठ्या नुकसानापासून बचाव करता येऊ शकतो.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं, पुरेसे पाणी पिणं, मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यावश्यक आहे. कारण एकदा किडनी निकामी होऊ लागली, की उपचार जास्त गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ होतात. त्यामुळे शरीरात होणारे सूक्ष्म बदल वेळेवर ओळखणे आणि त्याकडे दुर्लक्ष न करणे हाच उत्तम उपाय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT