Symptoms of Blood Cancer During Night Time saam tv
लाईफस्टाईल

Doctor Warns: शरीरात दिसणारे हे 5 सामान्य बदल असू शकतात ब्लड कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Blood cancer: कर्करोगाच्या प्रकारांमध्ये रक्ताचा कॅन्सर, ज्याला प्रामुख्याने ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा या नावांनी ओळखलं जातं, तो अत्यंत गंभीर आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड कॅन्सर अनेकदा कोणतंही ठळक लक्षण न देता शरीरात हळूहळू घडामोडी घडवतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा चुकीच्या प्रकारे समजून घेतलं जातं. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायेलोमा हा ब्लड कॅन्सर हाडांच्या मज्जारज्जूमध्ये सुरू होतात. ज्या ठिकाणी रक्ताच्या पेशी तयार होतात आणि हळूहळू शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

लवकर निदान केल्यास उपचार अधिक प्रभावी

DKMS फाउंडेशन इंडियाचे डॉ. नितीन अग्रवाल (MD, ट्रान्सफ्यूजन मेडिसिन) सांगतात की, ब्लड कॅन्सर लवकर ओळखल्यास उपचार अधिक यशस्वी होतात.

रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

सतत येणारा थकवा

सामान्य थकवा आणि रक्ताच्या कॅन्सरशी संबंधित थकवा यात मोठा फरक असणार आहे. हा थकवा अत्यंत तीव्र, सतत जाणवणारा आणि झोप किंवा विश्रांतीनेही कमी न होणारा असतो. डॉ. नितीन यांनी सांगितलं की, “शरीरात पुरेशा प्रमाणात आरोग्यदायी लाल रक्त पेशी तयार न होण्यामुळे अ‍ॅनिमिया होतो, जो ल्यूकेमिया आणि मायेलोमामध्ये सामान्य आहे.”

वारंवार इन्फेक्शन किंवा ताप

ज्यावेळी इम्यून सिस्टम कमजोर होते तेव्हा साधे संसर्गही गंभीर होतात. “ब्लड कॅन्सर आरोग्यदायी पांढऱ्या रक्त पेशींना कमी करतो. ज्या संसर्गाशी लढण्यासाठी अत्यावश्यक असतात. जर तुम्हाला वारंवार सर्दी, ताप होत असेल आणि ते जास्त तीव्र असतील किंवा बरे होण्यास वेळ लागत असेल, तर ते सामान्य सर्दीपेक्षा अधिक गंभीर असू शकते.

असामान्य रक्तस्त्राव

नाकातून रक्त येणं, हिरड्यांमधून रक्त, किंवा अचानक सूज येणं या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. डॉ. नितीन सांगतात की, हे प्लेटलेट्सच्या कार्यात बिघाड दर्शवतात जो ल्यूकेमियामुळे होतो. त्वचेवर लालसर किंवा जांभळ्या रंगाचे डाग दिसू शकतात ज्याला पिटिकिया म्हणतात. हे त्वचेखाली रक्तस्त्रावामुळे होतात.

वजन घट आणि रात्री घाम येणं

जर तुम्ही आहार किंवा जीवनशैलीत बदल न करता वजन गमावत असाल तर ते धोक्याचा इशारा असू शकतो. वजन घट, रात्री घाम येणं आणि ताप ही लिम्फोमाची “B लक्षणं” आहेत. ही लक्षणे अनेकदा तणाव किंवा हार्मोनल बदल म्हणून दुर्लक्षित केली जातात, पण ती सतत दिसत असतील, तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.”

Lymph Nodes सूजणं

जर मान, बगल किंवा मांडीच्या भागात वेदनारहित गाठ दिसत असेल आणि ती आठवड्यांनंतरही कमी होत नसेल, तर ती दुर्लक्षित करू नये. तसंच हाडांमध्ये सतत वेदना, विशेषतः छाती, मणक्यांमध्ये किंवा कंबरेत, ही मल्टिपल मायेलोमाशी संबंधित असू शकते.

ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपण

ब्लड कॅन्सर निदान झाल्यावर स्टेम सेल प्रत्यारोपण हा अत्यंत प्रभावी उपचार ठरतो. यामध्ये दूषित मज्जारज्जू काढून आरोग्यदायी रक्त तयार करणाऱ्या स्टेम सेल्स लावल्या जातात. डॉ. नितीन सांगतात, “यशस्वी प्रत्यारोपणामुळे संपूर्ण रक्त आणि इम्यून सिस्टम पुन्हा तयार होऊ शकते. यामुळे रुग्णाला नवीन जीवन मिळतं. पण योग्य डोनर शोधणं सोपं नसतं.

भारताला अधिक स्टेम सेल डोनर्सची गरज का आहे?

दरवर्षी भारतात ७०,००० पेक्षा अधिक लोक ब्लड कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडतात. जे एकूण नवीन कर्करोग रुग्णांपैकी ८% आहेत. पण केवळ ३०% रुग्णांना त्यांच्या कुटुंबातच HLA-सुसंगत डोनर मिळतो. उर्वरित ७०% रुग्णांना अनोळखी डोनरवर अवलंबून राहावं लागतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सततच्या दातदुखीमागे लपलेले असू शकतात 'हे' आजार

Maharashtra Politics: शरद पवारांना बालेकिल्लात मोठा हादरा, ३ शिलेदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी: सुप्रिया सुळे

त्वचेवर दिसून येतात युरीक एसिडचे धोकादायक संकेत, वेळीच ओळखा

EPF Account: EPF खात्यातील या चुका वेळीच टाळा, अन्यथा दर महिन्याचे फंड कमी होतील

SCROLL FOR NEXT