Heart attack symptoms warning saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या २-३ दिवस अगोदर शरीरात दिसतात ५ लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Heart attack symptoms warning: हार्ट अटॅक अचानक येतो असं अनेकांना वाटतं पण प्रत्यक्षात शरीर काही दिवस आधीच त्याची सूचना देत असतं. तज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका येण्याआधी २-३ दिवस शरीरात काही खास लक्षणं दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ नसतो. यामध्ये खासकरून आपलं आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यापूर्वी हार्ट अटॅक ही केवळ वयोवृद्धांची समस्या मानली जात होती. मात्र आता बदललेल्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्येही याचं प्रमाण वाढलं आहे.

हार्ट अटॅक म्हटलं की, अनेक लोकांना केवळ छातीत तीव्र वेदना होतात ही लक्षणं माहितीयेत. मात्र याची अशी अनेक लक्षणं आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कधीकधी आपलं शरीर आपल्याला संकेत देतं परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हार्ट अटॅक येण्याच्या २-३ दिवस अगोदर तुमच्या शरीरात ही लक्षणं दिसून येतात.

छातीत दाब जाणवणं

हार्ट अटॅकमध्ये तीव्र प्रमाणात वेदना होतात असं नाही. यावेळी बऱ्याच लोकांना छातीत घट्टपणा, जळजळ किंवा दाब जाणवू शकतो. ही अस्वस्थता काही मिनिटं टिकू शकते आणि नंतर कमी होऊ शकते. कधीकधी या वेदना छातीपासून डाव्या हातापर्यंत, खांद्यावर, मान, जबड्यात किंवा पाठीवर पसरतात.

कठीण काम न करताही श्वास घ्यायला त्रास होणं

जर तुम्हाला थोडं चालल्यानंतर, पायऱ्या चढून किंवा छोटं काम केल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हार्ट अटॅकचं लक्षण असू शकते. जेव्हा हृदय शरीराला योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पुरवू शकत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते.

गरजेक्षा जास्त थकणं

जर तुम्हाला घरातील कामं, चालणं यांसारख्या साध्या दररोजच्या कामांनीही जास्त थकवा जाणवत असेल आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा कमी होत नसेल तर ते हार्ट अटॅक येण्याचं लक्षण असू शकतं. हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांमध्ये हे लक्षण विशेषतः सामान्य आहे.

थंड घाम येणं

अचानक थंड घाम येणं किंवा कोणत्याही कारणाशिवाय जास्त घाम येणं हे हार्ट अटॅकचं एक लक्षणं असू शकतं. लोक अनेकदा या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात. जर या लक्षणासोबत छातीत दुखणे, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब टेस्ट करून घेतली पाहिजे.

चक्कर येणं

जर तुम्हाला अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं किंवा तुमचा तोल जातंय असं तुम्हाला जेव्हा वाटू लागतं तेव्हा सावधल राहिलं पाहिजे. हे हृदय आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचं लक्षण असू शकतं.

हार्ट अटॅक येण्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल?

  • संतुलित आणि निरोगी आहार घ्या.

  • दररोज हलका व्यायाम करा.

  • धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा.

  • ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.

  • तुमचा रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियमितपणे तपासा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वप्न अधुरंच! डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, नागपूरमधील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Ladki Bahin Yojana: पुण्यात लाडकी बहीण योजनेचे पुरूष लाभार्थी, १२०० जणांनी महिन्याला ₹१५०० लाटले, धक्कादायक माहिती समोर

Crime News : संधी साधून तो थेट मुलीच्या घरात शिरला अन्...; ऑनलाईन गेममधील मैत्रीचं भयानक वास्तव आलं समोर

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Long Hair Growth Tips: लांब केसांसाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खा

SCROLL FOR NEXT