Stomach acidity symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा पोटातील पित्त वाढतंय; अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी गॅस्ट्रो तज्ज्ञांचा सल्ला

Remedies for stomach acidity: अनेकांना पोटात अॅसिडिटीची समस्या वारंवार जाणवते. ही समस्या साधी वाटली तरी ती गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. अॅसिडिटी वाढल्यास त्वरित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Remedies for stomach acidity
Remedies for stomach aciditysaam tv
Published On

आपलं पोट बिघडलं की अनेकदा त्याला आपण जास्त किंवा मसालेदार जेवणाला जबाबदार धरतो. मात्र काही अभ्यांसांनुसार, या पोटात होणाऱ्या जळजळीमागे अनेक इतर गोष्टी कारणीभूत असतात. पोटातील आम्ल विशेषतः हायड्रोक्लोरिक एसिड हे तुमच्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याचं प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी झालं तर संपूर्ण सिस्टीमवर परिणाम होतो.

आम्ल म्हणजेच एसिड संबंधित लक्षणं लवकर ओळखल्यास पुढे होणार त्रास तुम्हाला टाळता येतो. यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारते. पोटात जास्त आम्ल तयार होण्याचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होणं. ही जळजळ छाती किंवा वरच्या पोटातून वर चढताना जाणवते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जास्त, तेलकट किंवा मसालेदार जेवणानंतर ही समस्या वाढते. तसंच झोपल्यावर हा त्रास तुम्हाला अधिक होऊ शकतो. अशावेळी काही लोकांना तोंडात आंबट किंवा कडवट चव जाणवू लागते. हे अॅसिड रिफ्लक्सचं ठळक लक्षण आहे.

Remedies for stomach acidity
Heart attack risk habits:'या' ४ सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका, आजच बदल करा अन्यथा....

जेवणानंतर ढेकर येणं, पोट फुगणं आणि मळमळणं ही लक्षणं अनेकदा दुर्लक्षित करण्यात येतात. मात्र ती पोटात जास्त आम्ल असल्याचे संकेत असू शकतात. जर ही समस्या सतत राहिली तर एसिड घशाला त्रास देऊ शकतं. यामुळे आवाज बसणं किंवा गिळताना त्रास होणं अशा समस्या होतात.

High stomach acid म्हणजेच पित्त जास्त झाल्याची लक्षणं ही सामान्याप्रमाणेच दिसतात. त्यामुळे निदान होणं कठीण असतं. जर पचनामुळे दररोज त्रास होत असेल तर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.

Remedies for stomach acidity
Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

एसिडीटीचा त्रास नैसर्गिकरित्या कमी करावा?

  • हे पदार्थ टाळा- मसालेदार पदार्थ, लिंबूवर्गीय फळं, टोमॅटो, कांदे, कॉफी आणि काही कोल्ड ड्रिंक्स एसिडीटी वाढवतात.

  • या पदार्थांचा आहारात करा समावेश- धान्यं, कमी फॅट असलेलं प्रोटीन, वाफवलेला भाजीपाला आणि नॉन-सिट्रस फळं खा.

Remedies for stomach acidity
Morning sneezing warning: सकाळी डोळे उघडताच शिंका सुरू होतात? शरीर देतंय गंभीर आजारांचा इशारा
  • कमी खाणं- एकाचवेळी जास्त नाही तर थोड्या थोड्या अंतराने खाणं खा. यामुळे पोटावरचा ताण कमी होतो आणि अॅसिड रिफ्लक्स टाळता येतो.

  • जेवणानंतर किमान दोन-तीन तास सरळ बसून किंवा उभे राहा.

  • पाणी पोटातील एसिडीटी dilute करतं. त्यामुळे पचनास मदत होते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com