Lunch Box Ideas For Kids  Saam Tv
लाईफस्टाईल

Lunch Box Ideas For Kids: मुले खाताना नाक मुरडतात? टिफिन बॉक्समध्ये द्या ५ हेल्दी पदार्थ, आरोग्य राहिल निरोगी

Healthy Tiffin Box Ideas: पालकांना सगळ्यात जास्त टेन्शन असते ते मुलांच्या टिफिनचे. अनेकदा मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ टिफिन बॉक्समध्ये दिले नाही की, ते नाक मुरडतात. अशावेळी पालकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरते.

कोमल दामुद्रे

Vegetarian Lunch Box Ideas for School Tiffin:

पालकांना सगळ्यात जास्त टेन्शन असते ते मुलांच्या टिफिनचे. अनेकदा मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ टिफिन बॉक्समध्ये दिले नाही की, ते नाक मुरडतात. अशावेळी पालकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरते.

रोज रोज मुलांच्या आवडीचे आणि चमचमीत आरोग्यदायी पदार्थ काय बनवायचे असा प्रश्न पालकांना पडतो. जर तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हेल्दी पदार्थांचा (Healthy Food) ऑप्शन पाहात असाल तर हे ५ हेल्दी पदार्थ नक्की टिफिनमध्ये द्या

1. इडली

दक्षिण भारतातील सगळ्यात आवडता पदार्थ इडली. नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात तुम्ही मुलांना (Child) देऊ शकता. अधिक हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यात बीटरुट, पनीर आणि पालक यांसारख्या गोष्टींचा समावेश करु शकता. इडली बनवण्यासाठी तुम्ही तांदूळ किंवा रव्याचा वापर करु शकता.

2. ब्रेड रोल

मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेड रोलही देऊ शकता. बटाट्याच्या स्टफिंगमध्ये तुम्ही चीज, सिमला मिरची, गाजर, बीटरुट आणि पालक घालू शकता. तेलात तळण्यापेक्षा तुम्ही एअर फ्रायमध्ये तळू शकता.

3. व्हेजिटेबल्स कटलेट

मुलांना कटलेट अधिक आवडते. याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही यात बटाट्यासोबत इतर अनेक भाज्या (Vegetables) देखील घालू शकता. यामध्ये भाज्या बारीक चिरुन त्याला ट्विस्ट देऊ शकता.

4. व्हेजिटेबल्स ओट्स

मुलांना टिफिनमध्ये व्हेजिटेबल्स ओट्स देऊ शकता. चव वाढवण्यासाठी यामध्ये चीज, भाज्यां घालून त्याची टेस्ट वाढवू शकता. ओट्समध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे तुमचे पोट अधिक वेळ भरलेले राहाते. याचे सेवन केल्याने खराब कोलेस्टेरॉल दूर राहाते.

5. बेसन चिला

बेसनचा चिला मुलांना अधिक आवडतो. हा चिला तयार करुन तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता. यामध्ये तुम्ही चीज आणि भाज्यांचे स्टफिंग करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT