These Habits Makes You Smart : काही लोकांसोबत वावरताना अनेक वेळा असे वाटते की ते खूप हुशार आहेत. अशी काही माणसे तुम्हालाही भेटत असतात. ज्यांना पाहून तुम्हालाही वाटत असेल ते खूप हुशार आहेत.
तर तुम्ही देखील इतरांपेक्षा हुशार होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या या सवयीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत जे इतरांपेक्षा हुशार ठरवते.
1. शिकण्याची आवड
हुशार लोकांना शिकण्याची आवड असते ते लोक नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे कितीही ज्ञान असले तरी ते स्वतःला श्रेष्ठ समजत नाही. याउलट त्यांना अजून शिकण्याची गरज आहे असे वाटत असते.
2. मोकळ्या विचारसरणीचे
मोकळ्या विचारांची माणसं स्वतःला बरोबर सिद्ध करण्याकडे लक्ष देत नाहीत. हे लोक दुसऱ्यांच्या मताचा आदर करतात आणि त्यांच्या विचारांचे स्वागत (Celebrate) करतात तसेच समोरच्या व्यक्तीच्या विचारातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात.
3. स्वतःला वेळ (Time) देतात
एका रिसर्चनुसार असे समोर आले की ज्या लोकांना स्वतःला वेळ द्यायला आवडते आणि जे लोक स्वतःशी बोलतात अशा लोकांना हुशार मानले जाते. त्यांना इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडत नाही किंवा इतरांच्या आयुष्यात (Lifestyle) हे लोक फारसा ढवळाढवळ करत नाहीत.
4. हुशार दिसण्याचा प्रयत्न करत नाहीत
हुशार लोक कधीच स्वतःहून सांगत नाही की ते किती हुशार आहेत. त्यांच्याशी संभाषन केल्याने आपल्या ते हुशार वाटतात. कारण हुशार लोक एखादी गुंतागुंतीची गोष्ट खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात.
5. प्रश्न विचारतात
हुशार लोक नेहमी ज्ञानाच्या शोधात असतात. त्यामुळे संभाषणादरम्यान ते इतरांवर प्रकाश टाकतात आणि त्यांना समोरच्या व्यक्तीला शक्य तितके प्रश्न विचारतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.