Remove Scratches Mobile Screen Using Toothpaste
Remove Scratches Mobile Screen Using Toothpaste Saam Tv

Smart Tips: टूथपेस्टने हटवा मोबाईल स्क्रीनवरचे स्क्रॅचेस; पण 'ही' काळजीही घ्या...

Smart Tips: या स्क्रॅचेसमुळे आपल्याला व्हिडिओ पाहताना किंवा काही वाचताना डिस्टर्ब होतं. त्यामुळे या मोबाईलच्या डिस्प्लेवरच्या या स्क्रॅचेस कशा हटवायच्या याबद्दल तुम्हाला एक खास टिप देत आहोत.
Published on

मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्मार्टफोन स्मार्ट असला तरी तो स्मार्टपणे काम करत रहावा यासाठी त्याची निगा राखणं महत्वाचं आहे. मोबाईलचा सर्वात नाजूक पार्ट म्हणजे मोबाईलची स्क्रीन. आजकलच्या बहुतेक मोबाईल्सची (SmartPhone) स्क्रीन ही गोरिल्ला ग्लासची असते. स्क्रीन शक्यतो लवकर तुटत नाही, पण अनेकदा मोबईलच्या स्क्रीनवर स्क्रॅचेस पडतात. खिशात चाव्या, चिल्लर किंवा इतर वस्तू असल्यास त्याने मोबाईलच्या डिस्प्लेवर रेषा पडतात, किंवा अनेकदा इतर काही कारणांमुळे मोबाईलच्या डिस्प्लेवर स्क्रॅचेस पडतात. या स्क्रॅचेसमुळे आपल्याला व्हिडिओ पाहताना किंवा काही वाचताना डिस्टर्ब होतं. त्यामुळे या मोबाईलच्या डिस्प्लेवरच्या या स्क्रॅचेस कशा हटवायच्या याबद्दल तुम्हाला एक खास टिप देत आहोत. (Remove Scratches Mobile Screen Using Toothpaste)

हे देखील पहा -

टिप देण्याआधी एक गोष्ट क्लियर करुन घ्या की, ही टिप प्रत्येक स्थितीत काम करणार नाही, केवळ छोटे स्क्रॅचेस आणि डाग यामुळे जातील. तर, मोबाईलच्या डिस्प्लेवरचे डाग घरगुती पद्धतीने घालवायचे असतील तर त्यासाठी केवळ दोन गोष्टी लागतील, ज्या आपल्या घरातही सहज मिळतील. एक म्हणजे व्हाईट टूथपेस्ट (Toothpaste) आणि दुसरी म्हणजे कापूस. टूथपेस्ट आणि कापसाच्या (Cotton) सहाय्याने मोबाईलच्या डिस्प्लेवरचे डाग आणि स्क्रॅचेस रिमूव्ह करता येतीस. चला तर मग पाहुयात मोबईल डिस्प्लेवरच्या स्क्रॅचेस घरच्या - घरी कशा हटवायच्या...

स्टेप १: सर्वप्रथम आपला मोबाईल कोरड्या कापसाने व्यवस्थित पुसून घ्या. मोबाईल धूळमुक्त करा.

स्टेप २: यानंतर डिस्प्लेवर चिमुटभर टूथपेस्ट टाका.

स्टेप ३: डिस्प्लेवरील टूथपेस्टला बोटाने संपुर्ण डिस्प्लेवर पसरवा आणि क्लॉकवाईज, अॅन्टी क्लॉकवाईज अल्पाय करा. ही प्रक्रिया दोन ते तीन मिनीटे करा.

स्टेप ४: संपुर्ण डिस्प्लेवर टूथपेस्ट अप्लाय केल्यानंतर आता एका कोरड्या कापसाने ही टूथपेस्ट व्यवस्थित पुसून घ्या, याने तुमच्या डिस्प्लेवरच्या छोटे स्क्रॅचेस आणि डाग नाहीसे होतील.

स्टेप ५: वरील सर्व प्रकिया झाल्यानंतर दोन थेंब पाणी मोबाईल डिस्प्लेवर टाकून पुन्हा कापसाने पुसून घ्या. याने तुमचा मोबाईल चांगलाच चकाकेल.

ही काळजी घ्या:

१) डिस्प्लेवर मोठ्या भेगा असतील तर हे करु नका.

२) टूथपेस्ट केवळ सफेद रंगाची (जेल नको) हवी.

३) योग्य प्रमाणात टूथपेस्ट अल्पाय करा

४) टूथपेस्ट मोबाईलच्या स्पीकर किंवा माईकच्या होलमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या.

तर अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी शून्य रुपयांत आपला मोबाईल चमकवू शकता. तुम्हाला आमची टिप कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com