World Asthma Day saam tv
लाईफस्टाईल

World Asthma Day: घरातील चादर आणि गादीमुळे अस्थमा, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

World Asthma Day 2025: आज वर्ल्ड अस्थमा डे आहे. या दिवसाच्या निमित्ताने या आजाराबाबत जनजागृती केली जाते. असातच एक धक्कादायक खुलासा भारतातील तज्ज्ञांनी केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

World Asthma Day: आजचा दिवस वर्ल्ड अस्थमा डे म्हणून मानला जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने या समस्येबाबत समाजात जागरूकता पसरवण्यात येते. अशातच मध्य प्रदेशातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून अस्थमाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या ठिकाणी अस्थमाच्या रूग्णांची संख्या ८ ते १२ टक्क्यांनी वाढत असल्याचं समोर आलं आहे.

सध्याच्या परिस्थितीत मध्य प्रदेशात ६० लाख अस्थमाचे रूग्ण असून यामधील १ ते ३ टक्के रूग्णांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या आनुवांशिक नसून यामागे वायू प्रदूषण, धूळ, एलर्जी, चुकीची लाईफस्टाईल हे घटक देखील कारणीभूत आहेत.

'हाउस डस्ट माइट'मुळे होतोय त्रास

रिजनल इंस्टीट्यूट ऑफ रेस्पिरेटरी डिसीज डॉ. निशांत श्रीवास्तव आणि डॉ. पराग शर्मा यांनी एक संशोधन केलं. यामध्ये हाउस डस्ट माइटमुळे अस्थमाचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे.

या संशोधनानंतर पराग शर्मा यांनी सामशी बोलताना सांगितलं की, या संशोधनातून असं समजलं की, अस्थमाची प्रकरणं ५०-६० टक्के हाउस डस्ट माइटमुळे होतायत. हा त्रास उशी, गादी आणि चादरींमुळे होऊ शकतो. स्वच्छता केल्यानंतर देखील हा हाऊस डस्ट माइट किडा उशी आणि चादरीवर येऊ शकतो. लहान मुलांमध्ये वेगाने हा आजार पसरत असल्याचं दिसून आलं आहे. १५ ते २० टक्के लहान मुलांमध्ये अस्थमाची समस्या आहे. एकूण रुग्णांपैकी १ ते ३ टक्के रुग्ण दम्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आहेत.

हाउस डस्ट माइट म्हणजे नेमकं काय?

"हाउस डस्ट माइट" म्हणजे घरातील धूळीमध्ये असलेला एक सूक्ष्म जीव किंवा किडा. घरातील धुळीमध्ये असलेले सूक्ष्म जीव किंवा किडे मानवी किंवा प्राण्यांच्या कोंडा, मृत पेशी खाऊन जगतात. हे आपल्या शरीरात गेल्यास त्रास होण्याचा धोका असतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दम्याची मुख्य कारणं ऍलर्जी, प्रदूषण आणि अनुवांशिकता आहे. भारतात सुमारे ३ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण १०० पैकी १५ ते २० आहे. यामध्ये श्वास लागणं, कोरडा कफ खोकला आणि शिंका येणं ही लक्षणं आहेत. तर अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये हा धोका तिप्पट असतो. परंतु आजकाल प्रदूषणामुळे हा आजार सर्वाधिक दिसून येतोय. चुकीचा आहार, एसीमध्ये राहणं, स्वच्छतेचा अभाव यामुळेही ही समस्या वाढताना दिसतेय.

धोका कसा कमी करावा?

स्वच्छता, मास्क, इनहेलर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या समस्येचा धोका ८०% कमी करता येतो. हवामान बदलत असताना जर तुम्हाला सततच्या शिंका, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा खोकण्याचा त्रास होत असेल तर ताबडतोब स्वतःची तपासणी करून घेणं फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT