नवीन वर्षातील दुसरा महिना फेब्रुवारी. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची उलाढाल होणार आहे. २०२४ मधला दुसरा महिना अनेकांसाठी खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे १२ राशींवर परिणाम होईल.
या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि या ग्रहाचे संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींसाठी त्रासदायक आणि चांगला ठरणार आहे. तसेच प्रत्येक ग्रहांचे त्याच्या राशीपरतवे वेगवेगळे परिणाम होतील. या संक्रमणामुळे १२ राशींवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया.
1. मेष
मेष राशीच्या लोकांच्या बॉस सोबत या महिन्यात वाद घालू नका. कामातून तुम्हाला त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. व्यावसाय करणाऱ्यांनी आर्थिक (Money) बाबीत सांभाळून राहावे. कौटुंबात (Family) अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आत्मविश्वास वाढवावा लागेल.
2. वृषभ
कामाला अधिक प्राधान्य द्या. कठोर परिश्रम करावे लागेल. परिणामांची चिंता करु नका. नोकरीत लक्ष द्या. राजकारणापासून दूर राहावे लागेल. व्यावसायिकांना कामात लक्ष द्यावे लागेल. कर्जासाठी (Loan) विलंब होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.
3. मिथुन
व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मार्केटर्सनी त्यांचे संवाद कौशल्य मजबूत करावे. नोकरी शोधणाऱ्यांना संयम बाळगावा लागेल. कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागेल. हवामानातील बदलाचा त्रास होऊ शकतो.
4. कर्क
करिअरवर लक्ष केंद्रित करा. ऑफिसमधून लांब प्रवास करावा लागेल. कुटुंबात अहंकाराचा कलह होऊ शकतो. वडिलांचा सल्ला घ्या. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आळशीपणा सोडा
5. सिंह
या महिन्यात अधिक मेहनत करावी लागेल. कृतीवर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात प्रतिस्पर्धी तयार होतील. अतिसंवेदनशील होण्याचे टाळा. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात. पैसे सुरक्षित ठेवा. धनहानी होण्याची शक्यता आहे.
6. कन्या
फूड बिझनेस करणाऱ्यांना फायदा होईल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आईसोबत वाद होऊ शकतो. अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
7. तूळ
नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. राजकारण क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात मुलांची प्रगती होईल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. दुखापत होण्याची शक्यता आहे.
8. वृश्चिक
मित्रांशी वाद घालू नका. कौटुंबिक गोष्टीत वाद होतील. त्यासाठी शब्द जपून वापरा. व्यावसायिकांनी काळजी घ्यावी. दाताच्या समस्या उद्भवू शकतात काळजी घ्यावी
9. धनु
धनु राशीच्या लोकांना आपले व्यक्तिमत्त्व सुधारावे लागेल. शारीरिक श्रम करावे लागतील. करिअरच्या क्षेत्रात व्यक्तिमत्त्व प्रभावी असेल. डोळ्यांची आणि दातांची काळजी घ्यावी लागेल.
10. मकर
हुशारीने काम करावे लागेल. बोलताना भान ठेवा. कुटुंबात धार्मिक विधी होतील. लवकरच लग्न जमण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत होणारे वाद टाळा. लहान भावासोबत वाद होण्याची शक्यता आहे.
11. कुंभ
खोटे बोलणे टाळावे अन्यथा नुकसान होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. संयामाने अभ्यास करावा लागेल. कुटुंबात दूरच्या नातेवाईकांशी वाद घालू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
12. मीन
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्च हळूहळू करा. अनावश्यक खरेदी करा. वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते. जोडीदाराशी वाद घालणे टाळा.पोटाशी संबधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.