Injection yandex
लाईफस्टाईल

Injection: इंजेक्शनला घाबरताय? काळजी करू नका; आता बिना सुईचं लागणार इंजेक्शन

Needle Free Injection: इंजेक्शनचं भीती घालवणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पण इंजेक्शनला घाबरत का?तर आता काळजी करू नका. आता बिना सुईचं इंजेक्शन लागणार आहे.

Dhanshri Shintre

अनेकांना इंजेक्शनची भीती वाटते. इंजेक्शनच्या भीतीमुळे डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. इंजेक्शनचं भीती घालवणारी एक चांगली बातमी समोर आलीय. इंजेक्शनला घाबरताय का? काळजी करू नका. आता बिना सुईचं लागणार इंजेक्शन. इंजेक्शनच्या वेदनेला कायमचा विसरा.

अनेक जण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जायला घाबरतात. कारण बऱ्याच जणांना इंजेक्शनची भीती वाटत असते. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या मनातून इंजेक्शनची कायमची भीती निघून जाणार आहे. आता लवकरच बिना सुईचं इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. भारतीय औद्योगिक संस्था अर्थात आयआयटी मुंबईनं हे संशोधन केलं आहे.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागानं शॉक सीरिंज इंजेक्शन बनवलं आहे. या तंत्रज्ञानानुसार त्वचेला छेद देण्यासाठी हाय एनर्जी प्रेशर शॉक्स वेव्हजचा वापर केला जातो. याचं नोझल केवळ १२५ मायक्रोन म्हणजे माणसाच्या एका केसाइतकं आहे. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत.

इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. शिवाय ज्या लोकांना डायबिटीसमुळे सातत्याने इन्सुलिन घ्यावं लागतं त्यांनाही याचा फायदा होणार आहे. लवकरच हे इंजेक्शन सर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे आता इंजेक्शनला नाही म्हणण्याची सवय मोडून टाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT