ब्लॅक कॉफी लिव्हरमधील फॅट कमी करून लिव्हर डिटॉक्स करते.
नियमित सेवनाने फॅटी लिव्हर आणि सिरोसिसचा धोका कमी होतो.
कॉफीतील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमधील सूज कमी करतात.
लिव्हर आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी घटक काढून टाकणे, पित्त तयार करणे, अन्नातील पोषक तत्वांचे रूपांतर करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक जबाबदाऱ्या लिव्हर पार पाडतो. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचे आहे.
देशातील नामांकित हेपॅटोलॉजिस्ट डॉ. शिवकुमार सरीन यांच्या प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, ब्लॅक कॉफी लिव्हरसाठी अत्यंत फायद्याची आहे. ब्लॅक कॉफी लिव्हरमधील फॅट काढून टाकते, त्याला डिटॉक्स करते आणि लिव्हर कॅन्सरचा धोका कमी करते. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की कॉफीचे फायदे मिळवण्यासाठी ती साखर, दूध आणि क्रीमशिवाय प्यावी.
ब्रिटिश लिव्हर ट्रस्टच्या अहवालानुसार, फॅटी लिव्हर आणि सिरोसिससारख्या आजारांमध्ये कॉफी फायद्याची ठरते. कारण कॉफीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमधली सूज कमी करतात. त्यामुळे फॅट जमा होत नाही आणि आधीपासून साचलेला फॅट वितळून बाहेर पडतो. त्यामुळे लिव्हर जास्त सक्रिय आणि स्वच्छ राहते. ब्लॅक कॉफीचे नियमित सेवन केल्यास हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा या प्रकारच्या लिव्हर कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
कॉफीमध्ये आढळणारे क्लोरोजेनिक अॅसिड हे अँटीऑक्सिडंट ग्लुकोजचे विघटन करून लिव्हरमध्ये फॅट तयार करण्यास थांबवते. याशिवाय कॉफीतील कॅफिन लिव्हरमध्ये ग्लुटाथायोन नावाच्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचे उत्पादन वाढते. याने विषारी घटक नष्ट होतात. मात्र, याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. पण दिवसातून एक ते दोन कप ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यास फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि इतर लिव्हर विकारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.