Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Sabja Seeds Risk: सब्जा बिया आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी त्याचं जास्त सेवन धोकादायक ठरू शकतं. अॅलर्जी, पचनाचे त्रास, औषधांशी प्रतिक्रिया आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.
Sabja Seeds Risk
Prostate Cancer Risksaam tv
Published On
Summary

सब्जा पौष्टिक असला तरी जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

अ‍ॅलर्जी, पचनाचे त्रास आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

दररोज फक्त २ ते अडीच चमचे सब्जा सेवन करा.

सब्जा नेहमी पाण्यात भिजवूनच खावा. कोरडे गिळू नये.

सब्जा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जाणाऱ्या बियांपैकी एक आहे. त्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे या बिया आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पण तज्ज्ञांच्या मते, या बियांचं जास्त सेवन केल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सल्विया हिस्पानिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बियांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅलर्जी, श्वास घेताना त्रास, पचनाचा त्रास, औषधांशी होणारा परस्पर परिणाम आणि अगदी कॅन्सरसारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीरासाठी कितीही फायदेशीर असलेल्या गोष्टींवर मर्यादा ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे.

Sabja Seeds Risk
Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

तज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीसाठी दररोज सब्जाचं प्रमाण साधारण २८.८५ ग्रॅम म्हणजेच दोन ते अडीच चमचे इतकं असावं. यापेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

फायबरयुक्त अन्नपदार्थांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. मात्र जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटदुखी आणि पचनाचे विविध त्रास निर्माण होतात. त्यामुळे या बिया आपल्या आहारात घेताना हळूहळू प्रमाण वाढवणं गरजेचं आहे.

तज्ज्ञ सांगतात की सब्जा पाण्यात भिजवून खाणं सुरक्षित असतं. कोरड्या बिया गिळल्यास त्या पोटात जाऊन फुगतात आणि घशात अडकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्या थेट न खाता भिजवून खाणे योग्य आहे. जास्त सब्जा खाल्ल्यास काही लोकांमध्ये त्वचेवर पुरळ, श्वसनाचा त्रास किंवा घशात खवखव, अॅलर्जि या समस्यांना सामोरं जावं लागू शकतो. याशिवाय रक्तदाब कमी करणाऱ्या किंवा ब्लड थिनर औषधांसोबत सब्जा घेतल्यास औषधांच्या परिणामात बिघाड होऊ शकतो.

आहारतज्ज्ञांच्या मते, सब्जा हे सुपरफूड आहे, पण त्याचं प्रमाण आणि सेवनाची पद्धत योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास त्या हृदय, पचनसंस्था आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. मात्र जास्त सेवन म्हणजे आरोग्य म्हणजे जास्त चांगलं ही चुकीची समजूत टाळणं गरजेचं आहे.

Sabja Seeds Risk
Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com