Dark Forehead Home Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Dark Forehead Home Remedies: चेहरा गोरा पण कपाळावर टॅनिंग जास्त ? जाणून घ्या कारणं व सोपे उपाय

How can I remove dark forehead : ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते, त्यांच्या कपाळाचा रंगही गडद होण्याची शक्यता असते.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : उन्हाळ्यात तुमच्या कपाळावर हायपरपिग्मेंटेशनची समस्या वाढते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या ऋतूत आपण कडक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो किंवा वारंवार घाम पुसतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते, त्यांच्या कपाळाचा रंगही गडद होण्याची शक्यता असते.

कपाळाचा गडद रंग हलका करण्यासाठी तुम्ही अनेक नैसर्गिक उपाय करू शकता ज्यामुळे कपाळाचा काळेपणा कमी होऊ शकतो. त्याआधी हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की हे उपाय त्वरित परिणाम दर्शवत नाहीत परंतु हळूहळू दिसू शकतात. त्यामुळे येथे आम्ही तुम्हाला कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय (Home Remedies) सांगणार आहोत.

कपाळाचा काळेपणा दूर करण्याचे उपाय

1. लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंटचे गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा उजळते. ते वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त एक ताजे लिंबू पिळून त्याचा रस काढावा लागेल. यानंतर ते तुमच्या कपाळावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने (Water) चेहरा स्वच्छ करा.

2. कोरफड

कोरफडमध्ये त्वचा (Skin) उजळण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे कपाळावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. तुम्हाला फक्त तुमच्या कपाळावर ताजे कोरफड जेल लावायचे आहे आणि 20 मिनिटांनी पाण्याने धुवावे लागेल.

3. टोमॅटोचा रस

टोमॅटोच्या रसामध्ये नैसर्गिक ऍसिड असतात जे त्वचा उजळण्यास मदत करतात. आपल्या कपाळावर टोमॅटोचा रस लावा आणि 1 मिनिट सोडा, नंतर पाण्याने धुवा

4. हळद

हळद ही नैसर्गिक त्वचा उजळणारी म्हणून ओळखली जाते. याच्या वापराने तुमच्या कपाळावरील काळेपणा दूर होऊ शकतो. तुम्हाला फक्त एक चमचा दुधात चिमूटभर हळद मिसळायची आहे. यानंतर थोडावेळ असेच कोरडे राहू द्या आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

5. बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीच एजंटचे गुणधर्म असतात जे त्वचेला हलके करण्यास मदत करतात. कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढा. त्यानंतर हा रस तुमच्या कपाळावर वर्तुळाकार गतीने लावा, 2 मिनिटे मसाज करा आणि 1 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sofia Ansari: सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण, बोल्ड फोटोंनी केलं सेलिब्रेशन

Maharashtra Live News Update: मनसेकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी

Mumbai Local Mega block : मुंबईत मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल; कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

मंत्री येत नसतील तर बिबटे सोडा, मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवारांचा सभागृहात संताप|VIDEO

Crocodile Mummy Egypt: वैज्ञानिकांनी उघडलं ३००० वर्षांपूर्वीचं मगरीचं ममी; आत दडलेलं रहस्य जगाला थक्क करणारं

SCROLL FOR NEXT