
Ghee Benefits For Skin : महिला स्वतःची त्वचा सुदंर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवगळे प्रयत्न करत असतात. निरोगी त्वचा मिळवण्यासाठी ब्रँडेड प्रोडक्ट्सचा वापर करतात. एवढे करूनही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
तुमच्या सोबतही असे होत असेल, तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला देसी तूप आवश्यकता आहे. आयुर्वेदात (Ayurved) देसी तुपाचा वापर वर्षानुवर्ष विविध आजार (Disease) दूर करण्यासाठी केला जात आहे.
त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्याचे कार्य देसी तूप करते. त्यामुळे तूप त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्वचेला देसी तुपाचे होणारे फायदे.
1. त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी
देसी तुपात असलेले व्हिटॅमिन ए आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड चे प्रमाण त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट राहण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच त्वचा डीप मॉइस्चराइजसाठी तुप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्याही दूर आणि त्वचा सॉफ्ट राहते
2. पिगमेंटेशन दूर करते
पिगमेंटेशनच्या समस्या दूर करणायसाठी तुप फायदेशीर आहे. तुपामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यासाठी सहकार्य करतात. ज्यामुळे पिगमेंटेशन मार्क्स देखील दूर होतात आणि त्वचेवरील चमक वाढते.
3. सुरकुत्या दूर करण्यासाठी
तूप कोलोजन प्रोडक्शन वाढवते, ज्यामुळे सुरकुत्याच्या समस्या टाळता येतात. म्हणून तुम्ही घरच्या घरी तुपाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकता. ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे गुणधर्म तुपात असतात. जे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते.
4. चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी
नियमितपणे दररोज चेहऱ्याला देसी तुपाने मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढते. परिणामी त्वचेवर चमक येते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो टिकवणून ठेवण्यासाठी तुम्ही देसी तुपाचा वापर करू शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.