Diwali 2024 saam tv
लाईफस्टाईल

Diwali 2024: दिवाळीचा लूक होईल खास, कॅरी करा ‘या’ स्टायलिश बॅग

diwali special new handbags : दिवाळीत बहूतांश महिला साड्या किंवा ट्रेडिशल ड्रेस या पद्धतीचे कपडे परिधान करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीत बहूतांश महिला साड्या किंवा ट्रेडिशल ड्रेस या पद्धतीचे कपडे परिधान करतात. त्यात काही महिला चोळी,घागरे अशा अनेक पद्धतीनेचे कपडे परिधान करतात. त्यावर त्यांना मॅचिंग आणि आकर्षक दिसणारी मॅचिंग एक्ससरीज, कानातले, चपला, विविध दागिने आणि हॅंडबॅग आवडतात. मात्र कोणती हॅंडबॅग आपल्या कपड्यांना मॅच होईल हा विचार प्रत्येक महिलेला गोंधळात पाडू शकतो. त्यासाठी काही खास टिप्स.

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कपड्यांचे रंग किंवा स्टाईल निवडा. त्याने तुम्हाला बॅग निवडणे सोपे जाईल. आता तुमच्या आउटफीटला मॅच होईल अशी हॅंडबॅग तुम्ही कशी निवडाल? हे पुढील मुद्यांनी लक्षात घ्या.

१. डार्क रंगाची हॅंडबॅग

तुम्ही जर ड्रेस परिधान करणार असाल तर तुम्ही डार्क रंगाची हॅंडबॅग वापरु शकता. ही बॅग लहान आकाराची असली तर उत्तम. त्यात तुम्ही साधा ड्रेसअप करणार असाल तर तुमची डार्क रंगाची हॅंडबॅग तुम्हाला हाईलाईट करेल.

२ सिंपल हॅंडबॅग

तुम्ही जर डार्क किंवा चमकदार कपडे परिधान करणार असाल तर, शक्यतो हॅंडबॅग वापरणे टाळा. मात्र तुम्हाला अधिक सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही साधी सिंपल हॅंडबॅग तुमच्या भरगच्च आउटफीटवर वापरु शकता.

३.मॅचिंग प्रिंट पर्स

तुम्हाला सुंदर साडीवर बॅग घ्यायची असेल तर तुम्ही साडीच्या डिजाइनची पर्स घेवू शकता. जर तुम्हाला ड्रेसशी मॅचिंग पर्स घ्यायची नसेल, तर तुम्ही ड्रेसच्या एम्ब्रॉयडरी, प्रिंट किंवा सिक्विनशी मॅचिंग पर्स कॅरी करू शकता.

४. पोटली स्टाईल हॅंडबॅग

बऱ्याच अभिनेत्री त्यांच्या साडी किंवा ड्रेस वर पोटली पोटली स्टाईल हॅंडबॅग वारताना दिसतात. याने तुम्ही पारंपारिक लूक परिधान करु शकता.

५. मेटल पर्स

कॉकटेल साड्या किंवा इंडो एथनिक को-ऑर्ड्स सेटवर तुम्ही मेटल पर्स खूप सुंदर दिसाल. त्यात तुम्हाला वेगवेगळ्या डिजाईनमध्ये देखील सहज मिळून जातील. त्यावर तुम्ही सोनेरी किंवा चांदीच्या हार्ड किंवा सॉफ्ट हॅंडबॅगवर खर्च करणे योग्य ठरु शकेल. अशा पद्धतीने या दिवाळीत तुम्ही सुंदर आणि हटके लूक तयार करु शकता.

Written by: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT