Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Borivali Fighting Video: बोरीवलीच्या गोराईमधील भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांमध्ये तुफान राडा झाला. एकमेकांना बेदम मराहाण करण्यात आली आली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
Borivali VideoSaam Tv
Published On

Summary -

  • बोरीवलीत जागेच्या वादावरून भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

  • बोरीवलीतील गोराई मंडईमध्ये ही घटना घडली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • झटापटीत एका विक्रेत्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिस गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करत आहेत.

बोरीवलीमध्ये जागेच्या वादावरून भाजी विक्रेत्यांमध्ये तुफान राडा झाला. मंडईमध्येच त्यांनी एकमेकांना धूधू धुतलं. आधी किरकोळ भांडण झालं आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत एक जण जखमी झाला. गोराई भाजी मंडईमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बोरिवली पश्चिम येथील गोराई भाजी मंडईत भाजीचा धंदा लावण्याच्या जागेवरून भाजी विक्रेत्यांमध्येच जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सकाळच्या सुमारास मंडईमध्ये ग्राहकांची गर्दी असताना हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एका विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्याच्या वादातून दोन विक्रेत्यांमध्ये हा वाद झाला. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

या झटापटीत एका विक्रेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. सध्या बोरवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोरीवली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हाणामारी करणारे हे नेमके कोण होते आणि नेमकी वादाची ठोस पार्श्वभूमी काय होती? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलेच्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली. ती महिला गोराई गावात राहते आणि ती शेती करते. या महिलेचा नवरा शेतातील भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतो. आज सकाळी महिलेचा नवरा भाजीपाला विकायला गेला होता. पण त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या भाजी विक्रेत्यासोबत त्याचे जागेवरून भांडण झाले आणि त्यांनी महिलेच्या पतीला मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये महिलेचा पती जखमी झाला.

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO
Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com