Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

Crime News Palghar : पालघर जिल्ह्यातील वाडा येथे एका युवकावर जीवघेणा हल्ला झाला असून, या हल्ल्यामागे त्याच्या सख्ख्या काकूचा हात असल्याचं उघड झालं आहे. तिने पुतण्याच्या हत्या करण्यासाठी एक लाखाची सुपारी दिली होती.
palghar News
Palghar Shocking Saam Tv
Published On
Summary
  • वाडा येथे रात्री स्कूटीवरून घरी जाताना ऋषिकेश मनोरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

  • डोळ्यांत मिरची टाकून मोबाईल व स्कूटी लुटण्यात आली

  • तपासात उघड – सख्ख्या काकूने एक लाखाची सुपारी देऊन गुन्हा घडवला

  • तिघे आरोपी नाशिक येथून अटकेत, काकू राधिका मनोरे फरार

पालघर जिल्ह्यातील वाडा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, एका २७ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यामागे त्याच्याच सख्ख्या काकूचा हात असल्याचे उघड झाले असून तिने एक लाख रुपये देऊन पुतण्याच्या हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. पोलीस संबंधित तरुणाच्या काकूचा शोध घेत असून इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाडा येथील आगर आळीतील पारिजात अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश मनोरे यांचे ‘पूजा भंडार’ नावाची चार दुकाने आहेत. २० जुलैच्या रात्री ऋषिकेश हे आपले दुकान बंद करून स्कूटीने घरी जात असताना जैन मंदिराजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, एक कॉल करायचा आहे,” असे सांगून त्यांनी ऋषिकेशला थांबवले. तिथेच तिघांपैकी एकाने अचानक त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली आणि उर्वरित दोघांनी धारदार शस्त्रांनी हात, डोके व पायावर वार करत जबर मारहाण केली. या हल्ल्यात ऋषिकेश गंभीर जखमी झाले आणि स्कूटीवरून खाली कोसळले. या संधीचा फायदा घेत तिघांनी त्यांचा मोबाईल व स्कूटी हिसकावून पळ काढला.

palghar News
Palghar Tourism : ना मरीन ड्राईव्ह, ना जुहू चौपाटी; वीकेंडला करा 'या' समुद्रकिनाऱ्याची सफर

गंभीर जखमी अवस्थेत ऋषिकेश यांना तातडीने ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला गती दिली. प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे आरोपी गेल्या दोन दिवसांपासून वाडा शहरात फिरत असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान ही घटना फक्त लूटमारीची नसून पूर्वनियोजित असल्याचा खुलासा झाला.

palghar News
Palghar Schoking News : मरणानंतरही यातना संपेना! भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, पालघरमधील भयान वास्तव

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले. सुशांत सोमनाथ चिडे आणि तुषार संजय मनवर हे दोघे बांगालीबाबा एसटी स्टँड कॉलनी, नाशिक येथील रहिवासी आहेत, तर तिसरा आरोपी यश अजय कंरजे साकोरे (ता. नांदगाव) येथील आहे. या तिघांची चौकशी करताना एक मोठा गौप्यस्फोट झाला. ऋषिकेश मनोरे यांची सख्खी काकू राधिका मनिष मनोरे हिनेच कुटुंबातील वादातून पुतण्याचा काटा काढण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी या गुन्हेगारांना दिली होती. सदर काकू सध्या फरार असून, वाडा पोलिसांनी तिच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

palghar News
Sunil Pal Kidnapping : कॉमेडियन सुनील पालच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड अर्जुन कर्नावालचा बदलापूर पॅटर्नने एन्काउंटर

या प्रकरणामुळे वाडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील वाद इतका टोकाला जाऊ शकतो यावर विश्वास बसत नसून, आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत असून राधिका मनोरेचा लवकरच छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Q

हल्ला कोणावर आणि कधी झाला?

A

२० जुलै रोजी वाडा येथील ऋषिकेश मनोरे यांच्यावर रात्री जैन मंदिराजवळ हल्ला झाला.

Q

आरोपी कोण होते?

A

नाशिक येथील तीन युवक — सुशांत चिडे, तुषार मनवर आणि यश कंरजे — यांनी हल्ला केला.

Q

हल्ल्यामागचं कारण काय?

A

कुटुंबातील वादातून ऋषिकेश यांची सख्खी काकू राधिका मनोरे हिने पुतण्याच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

A

तिघांना अटक करण्यात आली असून काकू फरार आहे. पोलीस तिच्या शोधात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com