Surabhi Jayashree Jagdish
पारोळा धबधबा हा हिंगोली जिल्ह्यातील एक शांत, प्रसिद्ध नसलेला पण अत्यंत नयनरम्य धबधबा आहे.
पावसाळ्यात हिरवळ, वाहणारं पाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
पारोळा धबधबा हा स्थानिक पातळीवर लोकप्रिय असून तो पर्यटकांनी फारसा गजबजलेला नसतो.
मोठ्या खडकांवरून वाहणारं पाणी आणि खालच्या बाजूला तयार होणारा तलाव पर्यटकांसाठी आकर्षण असतो.
सर्वप्रथम हिंगोली शहर गाठा. हिंगोली शहरातून परळवाडी मार्गे पारोळा गाव गाठावं.
पारोळा गाव हिंगोलीपासून सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहे. गावातून धबधब्यापर्यंत स्थानिक वाटेने जावं लागतं. जे सुमारे एक ते दोन किलोमीटर लांब आहे.
मुंबईहून हिंगोली सुमारे ५५० किलोमीटर आहे. हिंगोलीहून पारोळा धबधबा २५ ते ३० किलोमीटर लांब आहे.
जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये धबधबा पूर्ण प्रवाहात असतो. या काळात वातावरण थंड आणि हिरवळ भरभरून असतं.