Stress Relief At Work: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

Dhanshri Shintre

खांद्यांचा व्यायाम करणे

खांदा वर उचला मागे करा आणि मग खाली सोडा ही क्रिया १० वेळा करा म्हणजे मानेतील तणाव कमी होईल.

मानेचे व्यायाम

मान हळूहळू उजवीकडे वळवा, मग डावीकडे. मग वर आणि खाली. प्रत्येक स्थितीत 5 सेकंद थांबा.

सजग श्वास घेणे

डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडा. ही प्रक्रिया 5 मिनिटे करा. मन शांत होते.

हातांची ताणून हालचाल

दोन्ही हात वर उचला आणि ताणून धरून ठेवा. डावीकडे आणि उजवीकडे वाकून साइड स्ट्रेच करा.

पाठ सरळ ताठ बसणे

कंबर खुर्चीच्या आधाराला लागलेली असावी, मान आणि पाठ सरळ ठेवा. वेळोवेळी स्वतःला स्मरण करून द्या.

पाय ताणणे

एका वेळेस एक पाय पुढे ताठ करा, काही सेकंद धरून ठेवा आणि खाली ठेवा. दोन्ही पायांनी करा.

मणक्याचा ताण कमी करणे

पुढे झुकून मानेसकट पाठीचा मणका गोल करा (cat pose), आणि मग छाती बाहेर काढून पाठीचा कणा ताणवा

मन शांत करणारा ध्यान प्रकार

डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. फक्त ५ मिनिटे हा सराव रोज करा.

हाताचे वळवणे आणि ताणणे

हात सरळ समोर धरून मनगट आणि बोटांचे हळूहळू वळवणे, ताणणे. लॅपटॉपवर टायपिंग करताना होणारा ताण कमी होतो.

NEXT: मासिक पाळीच्या वेळी स्तन दुखतात? जाणून घ्या यामागील हार्मोनल बदल आणि उपाय

येथे क्लिक करा