Shani Shingnapur : शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम जमा

Ahilyanagar News : संबंधित कंपन्यांनी थोड्या- थोड्या स्वरूपात कधी १ लाख, कधी २ लाख अशा प्रकारे रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यांत वळवली. त्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे
Shani Shingnapur
Shani ShingnapurSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहिल्यानगर : शनी शिंगणापूर देवस्थान संबंधित बनावट अ‍ॅप प्रकरण सध्या गाजत आहे. पोलीस प्रशासनाकडून तपासाला गती देण्यात आली असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी थोड्या- थोड्या रकमेच्या स्वरूपात ही रक्कम खात्यांत टाकली आहे. 

शनी शिंगणापूर येथील बनावट अँप प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून देवस्थानच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या आधी सायबर विभागाच्या चौकशीनंतर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात पूजा परिसेवा डॉट कॉम, नवग्रह मंदिर डॉट कॉम, ऑनलाइन प्रसाद डॉट कॉम, हरी ओम अ‍ॅप आणि इपूजा डॉट कॉम या पाच बनावट अ‍ॅप्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Shani Shingnapur
Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

आणखी बनावट अँप असण्याची शक्यता 

सदर बनावट अँप प्रकरणात एका तक्रारीत पाच बनावट अ‍ॅप्सचा उल्लेख करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात केवळ हे पाच नव्हे; तर आणखीही काही बनावट अ‍ॅप्स कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच प्रमाणे पोलीस आता देवस्थानच्या अधिकृत ऑनलाईन अँपची देखील चौकशी करत असून अधिकृत अँपच्या माध्यमातून देखील संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले आहे का? याचा देखील पोलीस तपास करण्यात येतं आहे.  

Shani Shingnapur
Amravati : पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास नकार, नातेवाईक संतप्त

दोन्ही कर्मचाऱ्यांची कसून चौकशी 

तर अधिकृत अँपच्या माध्यमातून देवस्थानला किती रकम देवस्थान खात्यात जमा झाली आहे. हे देखील तपसण्याचा काम पोलीस करत आहे. मुळात या बनावट अँप प्रकरणात देवस्थानमधील दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात १ कोटीपेक्षा अधिकची रक्कम जमा झाली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, त्यांनी हे पैसे पुढे कोणाला दिले का, यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com