Monsoon Travel Trip : बरसणाऱ्या सरी, वीकेंड आणि हिरवागार निसर्ग बहुतेकांना आवडतो. पावसाळा सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते बाहेर फिरण्याचे. पावसाळा हा ऋतू प्रेमाचा व वातवारण बदलाचा. या मोसमात फिरायला जाण्यासाठी आपण जाण्यापासून रिटर्न येण्यापर्यंतच्या अनेक गोष्टीची तयारी करतो.
परंतु, जर तुम्हाला तुमचा वेकेशन मोड सोपा पण अधिक आनंददायी घालवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. बरेचदा आपण फिरायला जाताना अधिक सामान घेऊन जातो आणि ट्रिपची मजा लुटायची सोडून बॅग सांभाळत बसतो. तर कधी कधी समान इतका होतो की, गरजेचा सामान हा घेताच येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची बॅग जास्त जडही होणार नाही व तुमची ट्रिप मजेशीर होईल.
1. वॉटरपूफ्र बॅग
पावसाळ्यात (Monsoon) सहलीला जाण्यापूर्वी कोणतेही सामान पॅक करण्यापूर्वी सामान्य बॅगऐवजी वॉटरप्रूफ बॅग वापरावी. यामुळे तुमचा मोबाईल (Smartphone), कपडे, खाण्या-पिण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टी खराब होण्यापासून वाचू शकतात. यासाठी प्लास्टिक पिशव्या किंवा झिप लॉकर पिशव्याही वापरता येतील. अशा परिस्थितीत सहलीला जाण्यापूर्वी सर्व सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ बॅग अधिक चांगली ठरेल.
2. रेनकोट
सहलीला सुरुवात करण्यापूर्वी पहिली गोष्ट म्हणजे तुमचा रेनकोट पॅक करणे. रेनकोट फक्त पावसापासून तुमचे रक्षण करत नाही, तर आजारी पडण्यापासूनही बचाव करतो. यासाठी तुम्ही अर्धा किंवा पूर्ण वॉटरप्रूफ रेनकोट घेऊन जाऊ शकता. रेनकोटऐवजी तुम्ही मोठे प्लास्टिक देखील वापरू शकता, जेणेकरून तुमचे संपूर्ण शरीर झाकले जाईल.
3. झटपट सुकणारे कपडे
जर तुम्ही पावसाळ्यात सहलीला जात असाल तर पावसाळ्यानुसार कपडे पॅक करावेत. पावसाळ्यात जाड कपडे पॅक केले तर वाळवण्याची अडचण येते. त्यामुळे पावसाळ्यात प्रवासाला जाण्यापूर्वी जाड आणि सिंथेटिक प्रकारचे कपडे पॅक करा. ते लवकर सुकतात तसेच ते अधिक जडही नसतात. कपड्यांव्यतिरिक्त, वॉटरप्रूफ शूज पॅक करण्यास विसरू नका.
4. फर्स्ट एड बॉक्स
पावसाळयात बरेचदा फिरायला (Travel) जाताना वातावरणातील बदलामुळे आपण आजारी पडतो. यासाठी आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असायला हवा. या ऋतूमध्ये डास, मुंग्या किंवा त्वचेला इन्फेक्शन होण्याची भीती असते त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स फायदेशीर ठरतो.
5. या गोष्टी पण पॅक करा
पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी पॅक करायला विसरू नका. कपड्यांव्यतिरिक्त हेअर ड्रायर हा केस सुकवण्यासाठी उपयोगी पडेल. तसेच पॉवर बँक, वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर आणि छत्री पॅक करायला विसरू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.