Devkund Waterfall : तरुणाईला खुणावणारा पुण्यातील देवकुंड धबधबा...!

How To Reach Devkund Waterfall : . डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा देवकुंड
Devkund Waterfall
Devkund Waterfall Saam tv
Published On

Pune Famous Waterfall : पुण्याला निसर्ग सौंदर्य लाभलं आहे हे अगदी खरं. पावसाळा म्हटलं की, ट्रेकर्सप्रेमींना आठवतात ते गडकिल्ले किंवा धबधबे. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत जे डोळे दिपवतात.

बर्‍याचदा आपल्याला फक्त अशाच ठिकाणी जायला आवडते, ज्याबद्दल आपण ऐकले असते किंवा ज्यांची आपल्याला माहिती असते. पण भारतात अनेक न पाहिलेली आणि अनोळखी ठिकाणे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशी ठिकाणे फिरण्याची मजा काही वेगळीच असते, कारण अशी अनोखी ठिकाणे तुमच्या आठवणीत राहतात. त्यातील एक देवकुंड धबधबा

Devkund Waterfall
Famous Waterfall Near Mumbai : हिरवा निसर्ग हा भोवतीने..., वीकेंडला भेट द्या मुंबईतील या मनमोहक धबधब्यांना

रायगड (Raigad) जिल्ह्यातील देवकुंड धबधबा तरुणाईला सतत खुणावतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असेलला धबधबा तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. परंतु, या धबधब्यावर जाणे देखील तितकेसे सोपे नाही. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा चमत्कार आहे.

1. पुण्यात (Pune) कुठे आहे हा धबधबा ?

भिरा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा आहे. भिरा गावात पोहचल्या नंतर अंदाजे दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते. यासाठी साधारण 7 किलोमीटर चालावे लागते.

Devkund Waterfall
Place To Visit in Rainy Seasons : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत बेस्ट !

2. पुण्यातून कसे जाल देवकुंड धबधब्यावर ?

पुण्यातील चांदणी चौकातून किमान ७० किमी अंतरावर भिरा परिसर आहे. येथे जाण्यासाठी चांदणी चौक- पिरंगुट- पौड- माले- मुळशी- चाचवली- वारक- निवे सारोळे- ताम्हिणी घाट परिसरातून जावे लागते.

Devkund Waterfall
Why Women Choose Younger Men To Love : महिलांच्या आवडीनिवडीबाबत नवं संशोधन, आश्चर्यचकित करणारी निरीक्षणे

3. देवकुंड धबधब्याचे सौंदर्य

देवकुंड धबधबा हे लवासातील एक लपलेले रत्न आहे. 20 फूट उंचीवरून कोसळणारे पाणी पाहून प्रवाशांना डोळे दिपतात. येथे पोहोचल्यानंतर देवकुंड पर्यटन टीम तुम्हाला कॅम्पिंग, ट्रेकिंग यांसारख्या साहसी उपक्रमांची संपूर्ण माहिती देते. सहल अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी, तुम्ही इथल्या गावातल्या छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये स्वादिष्ट पदार्थ खाऊ शकता.

4. धबधब्यावर गेल्यानंतर या चुका करु नका

  • देवकुंड धबधब्यावर जाताना लहान मुलांना घेऊन जाण्यास मनाई आहे.

  • ट्रेकिंग (Trekking) करण्याची आवड असेल तरच येथे जा.

  • भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. दोन तास चालून धबधब्यावर पोहचल्यावर भुक लागते. त्यामुळे सोबत काहीतरी अन्नपदार्थ ठेवावेत.

  • स्पोर्ट शूज किंवा पावसाळी शूज असला तरी चालेल. परंतू त्याला ग्रीप असणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com