EPFO Recruitment 2024 Saam TV
लाईफस्टाईल

EPFO Recruitment 2024: तरुणांसाठी खुशखबर! EPFO मार्फत भरती प्रक्रिया सुरू; वाचा पोस्ट, पात्रता आणि पगार किती?

EPFO Vacancies 2024 How To Apply: EPFO स्टॅटिस्टिकल असिस्टंट पदासाठी भरती होत आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराला PB-02 फॉरमॅटमध्ये मासिक स्वरूपात कामाचा मोबदला म्हणजेच पगार दिला जाणार आहे.

Ruchika Jadhav

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी भरती समोर आली आहे. EPFO मध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. 'सांख्यिकी' सहाय्यक (Statistical Assistant) या पदासाठी भरती होणार असून यामध्ये फक्त एकच जागा शिल्लक आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती पुढे सांगितली आहे.

EPFO स्टॅटिस्टिकल असिस्टंट पदासाठी भरती होत आहे. यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराला PB-02 फॉरमॅटमध्ये मासिक स्वरूपात कामाचा मोबदला म्हणजेच पगार दिला जाणार आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा किती?

२०२४ च्या EPFO भरती अधिकृतसूचनेनुसार, सांख्यिकी सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये फक्त १ रिक्त जागा भरली जाणारे.

EPFO भरतीमध्ये यशस्वी उमेदवाराचे वेतन किती?

2024 च्या EPFO भरतीमध्ये निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना PB-2 मध्ये ९३०० रुपये - ३४८०० + रुपये GP ४२०० रुपये मिळतील

EPFO भरतीसाठी आवश्यक पात्रता

EPFO भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 'सांख्यिकी' विषयांपैकी एका विषयात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. हेच उमेदवार या पदासाठी अपल्या करू शकतात.

EPFO भरतीसाठी अनुभव काय असावा?

२०२४ च्या EPFO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान ३ वर्षांचा सांख्यिकीय कामाचा अनुभव असावा.

२०२४ च्या EPFO भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

२०२४ च्या EPFO भरती अधिकृतसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर आधी भेट द्यावी. त्यानंतर तेथे अर्ज भरून नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करून ऑफलाइन अर्ज भरावा. यासोबतच अर्जामध्ये नमूद केलेली कागदपत्रे जोडणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख

अधिकृतसूचनेनुसार, ही सूचना ७ जून २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या तारखेपासून १५ दिवसांच्या आत तुम्ही हा अर्ज भरू शकता. म्हणजेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जून २०२४ आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT