कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पीएफ खातेधारकांच्या मृत्यू दाव्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. ईपीएफओने परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. ईपीएफओमध्ये खातेधारकांच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा पैसे ज्या व्यक्तीला द्यायचे आहेत. त्या व्यक्तीची ओळख पटवणे थोडे अवघड होत होते. त्यामुळेच निर्णय घेतला आहे.
अनेकांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी लिंक झालेले नसते किंवा अनेकदा आधार कार्डची माहिती आणि पीएफ खात्याची माहिती सारखी नसते. त्यामुळे नॉमिनीला पैसे मिळण्यात खूप अडथळे येतात. त्यामुळेच आता जरी तुमची माहिती अर्धवट असेल तरी खातेदाराचे पैसे नॉमिनीला दिले जाणार आहेत, यामुळे मृत्यूचा दावा सेटलमेंट करणे सोपे होणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीच्या माहितीमध्ये चुका झाल्या असतील. किंवा तांत्रित कारणामुळे आधार कार्ड नंबर निष्क्रिय झाला असेल. तर मृत्यूचा दावा करताना अनेक समस्या येतात. यामुळे नॉमिनी व्यक्तीला माहितीची पडताळणी करताना अडथळे येतात. तसेच नॉमिनी व्यक्तीला पैशासाठी खूप वेळ वाट पाहावी लागते. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, पीएफ खातेधारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करता येत नाही. त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या पडताळणीच्या आधारावर नॉमिनीला पैसे दिले जाते. यासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. प्रादेशिक अधिकाऱ्याचा शिक्का असल्याशिवाय नॉमिनीला पैसे दिले जाणार नाही. कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून ईपीएफओने विशेष काळजी घेतली आहे. नवीन नियमांनुसार, जो नॉमिनी असेल त्या व्यक्तीची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्यांना पैसे दिले जातील. हा नियम फक्त खातेधारकाच्या आधार कार्डात चुका असेल तेव्हाच लागू होईल.
पीएफ खातेधारकाने जर नॉमिनी म्हणून नाव दिले नसेल, कर पीएफचे पैसे मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला दिले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.