EPF Advance: मुलीच्या लग्नाची चिंता मिटली! पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

EPF Advance Appication Process: मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नाची काळजी कुटुंबियांना असते. पालक मुलीच्या लग्नासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढू शकता.
EPFO latest news
EPFO latest news google
Published On

EPF Fund Advance Payment For Daughter Marriage:

मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नाची काळजी कुटुंबियांना असते. पालक मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवतात, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. मात्र, तरीही कधीकधी पैशांची गरज भासते. यासाठी तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढू शकतात. आप्तकालीन परिस्थितीत किंवा खर्चासाठी तुम्ही जास्त पैसे काढू शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये कर्मचाऱ्यांचे पैसे असतात. हे पैसे एक गुंतवणूक असते. ही गुंतवणूक तुम्ही काही कालावधीनंतर काढू शकतात. हे पैसे काढण्यासाठी काही सरकारी नियम आहेत. या नियमांचे पालन करुन तुम्ही EPF मधून पैसे काढू शकतात. (Latest News)

EPF सदस्य या कारणांसाठी पैसे काढू शकतात.

मेडिकल इमरजन्सी, शिक्षण, लग्न, जमीन खरेदी करणे, घर रिनोव्हेशन, बेरोजगारी किंवा मुलांचे लग्न यासाठी तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. सदस्यत्वाची ७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ईपीएफमधून आगाऊ रक्कम काढू शकतात. तुम्ही जवळपास ५० टक्के आगाऊ रक्कम काढू शकतात.

EPFO latest news
SBI New Scheme: निवृत्तीनंतरही बँक खात्यात येईल पैसा; काय आहे SBI ची खास स्कीम

पीएफमधून अॅडव्हान्स पैसे काढण्याची प्रोसेस

  • पीएफमधून अॅडव्हान्स पैसे काढण्यासाठी तुम्ही www.epfindia.gov.in वेबसाइटवर क्लिक करा. होम पेजवर ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉग इन करावे लागेल.

  • तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर साइन इन करावे लागेल.

  • यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा. त्यानंतर EPF मधून आगाऊ रक्कम काढण्यासाठी फॉर्म निवडा. यानंतर ड्रॉप डाइन मेन्यूमध्ये क्लेम फॉर्म निवडा.

  • दिलेल्या विंडोमध्ये तुमच्या बँक खात्याचे शेवटचे ४ नंबर भरा. यानंतर proceed for online claim वर क्लिक करा.

  • ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स फॉर्म निवडा. यानंतर पैसे काढण्याचे कारण लिहा, किती पैसे काढायचे आहेत हेदेखील लिहा. चेकची स्कॅन केलेली एक प्रत अपलोड करा आणि तुमचा पत्ता लिहा.

  • यानंतर Get OTP वर क्लि क करा. तुमच्या फोनवर आलेला ओटीपी लिहा. यानंतर तुमचा दावा दाखल होईल. काही दिवसांना क्लेमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

EPFO latest news
PM Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com