How To Check EPF Balance : तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम कशी पाहाल? वाचा सविस्तर

Check EPF Balance : EPFO ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी PF खात्यावरील व्याजदर 8.25 टक्के केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हा व्याजदर लागू होईल. यापूर्वी पीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याज दिले जात होते.
How To Check EPF Balance
How To Check EPF BalanceSaam Tv
Published On

EPF Balance :

EPFO ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी PF खात्यावरील व्याजदर 8.25 टक्के केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हा व्याजदर लागू होईल. यापूर्वी पीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याज दिले जात होते. जे लोक खाजगी क्षेत्रात काम (Work) करतात ते पीएफ खात्याशी परिचित असतील. परंतु मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्याकडे लक्ष देत नाहीत.

योग्य प्रक्रिया माहित नसल्यामुळे, त्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील कळू शकत नाही. तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेणे खूप सोपे आहे. उमंग ॲप, ईपीएफओ पोर्टल, मिस्ड कॉल आणि मेसेजद्वारे तुम्ही तुमची पीएफ शिल्लक देखील जाणून घेऊ शकता. चला तर जाणून घेऊयात...

उमंग ॲप

कर्मचारी त्यांच्या स्मार्टफोनवर उमंग ॲप डाउनलोड (Download) करून त्यांचा पीएफ रक्कम तपासू शकतात. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी सरकारने उमंग ॲप जारी केले होते. युजर्स त्यांचा पीएफ घर बसल्या क्लेम करू शकतात, त्यांचे ईपीएफ पासबुक पाहू शकतात आणि या ॲपचा वापर करून त्यांच्या क्लेम केल्याचा मागोवा घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला ॲपमध्ये तुमचा फोन नंबर टाकावा लागेल आणि एकवेळ नोंदणी करावी लागेल.

How To Check EPF Balance
EPFO Interest Rate : नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर! PF च्या व्याजदरात वाढ होणार?

EPFO पोर्टल

EPFO वेबसाइटवर जा आणि कर्मचारी विभागात क्लिक करा आणि नंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून तुम्ही PF पासबुकमध्ये प्रवेश करू शकता. यामध्ये, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स तसेच कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान दर्शविले जाईल. कोणत्याही PF ट्रान्सफरची एकूण रक्कम आणि जमा झालेल्या PF व्याजाची रक्कम देखील दिसेल. पासबुकमध्ये EPF रक्कम देखील पाहता येईल.

मिस्ड कॉल

जर तुमचा मोबाईल नंबर UAN वर नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल करून माहिती मिळवू शकता. या नंबरवर मिस्ड कॉल केल्यानंतर, तुम्हाला EPFO ​​कडून काही संदेश येतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्यातील रक्कम दिसेल.

How To Check EPF Balance
How To Check PF: तुमची कंपनी खरचं तुमच्या पीएफ खात्यात पैसे टाकतेय का? कसं समजेल?

एसएमएस

7738299899 वर मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या EPF खात्यातील रक्कम आणि तुमच्या खात्यातील नवीन जमा झालेली रक्कम देखील जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला AN EPFOHO ENG टाइप करावे लागेल आणि नोंदणीकृत क्रमांकावरून संदेश पाठवावा लागेल. ENG इथे इंग्रजीचा संदर्भ देते. तुम्हाला दुसऱ्या भाषेत जाणून घ्यायचे असेल तर त्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाईप करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com