ईपीएफ, आयटीआरसह ही 4 महत्त्वाची कामं करण्यासाठी उरले फक्त 7 दिवस

आयटी रिटर्नसह इतर चार महत्त्वाची कामे आहेत, ज्यांची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत आहे.
ईपीएफ, आयटीआरसह ही 4 महत्त्वाची कामं करण्यासाठी उरले फक्त 7 दिवस
ईपीएफ, आयटीआरसह ही 4 महत्त्वाची कामं करण्यासाठी उरले फक्त 7 दिवसSaam TV
Published On

तुम्ही तुमचे आयटी रिटर्न अजून भरले नसेल, तर ते लवकर भरा. ते भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आयटी रिटर्नसह इतर चार महत्त्वाची कामे आहेत, ज्यांची अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

उरले फक्त सात दिवस

आयटी रिटर्न्स

नवीन आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे आणि कोरोना विषाणूमुळे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख आधीच दोनदा वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका आणि लवकरात लवकर विवरणपत्र सादर करा, असा सल्ला विभागाने दिला आहे. त्यानंतर सबमिशन केल्यास दंड आकारला जाणार असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

पीएफ खाते आधारशी लिंक करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाते आधार कार्डशी लिंक करण्याची आणि नॉमिनीचे नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ईपीएफ खाते (यूएएन) आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. खातेदारांनी तसे न केल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करा

सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वर्षातून एकदा 30 नोव्हेंबरपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यंदा त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास, पेन्शन थांबविली जाण्याची शक्यता आहे.

डीमॅट-ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी करा

SEBI ने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे KYC करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरवरुन 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, वर्तमान मोबाइल क्रमांक, वय, योग्य ईमेल आयडी यासारखी माहिती अपडेट करावी लागेल. जर KYC केले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com