Gold Silver Rate Hike : सोन्यासह चांदीची चकाकी वाढली; वाचा मुंबई-पुण्यातील नव्या किंमती

Gold Silver Rate (21 May 2024) : अमेरिकेच सोन्यासह चांदीची गुंतवणूक वाढली आहे. अशात आजच्या सोने-चांदीच्या किंमती काय आहेत याची माहिती घेऊ.
Gold Silver Rate (21 May 2024)
Gold Silver Rate HikeSaam TV

सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरुच आहेत. सोमवारी सोन्याच्या किंमती थोड्या कमी झाल्या होत्या तर आज मंगळवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. चांदीच्या किंमतीत सोमवारी मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर तब्बल २ हजार ५०० रुपयांनी वाढले. त्यानंतर आजही चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.

Gold Silver Rate (21 May 2024)
Business Ideas : नोकरीचा कंटाळा आलाय? घरबसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हा लखपती, कसं वाचा सविस्तर

सोन्याच्या किंमती वाढण्याचं कारण काय?

अमेरिकेच सोन्यासह चांदीची गुंतवणूक वाढली आहे. तसेच चीनकडून देखील सोने खरेदी वाढली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच सोने आणि चांदीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अक्षय्य तृतीयेला देखील दर वाढले होते. अशात आजच्या सोने-चांदीच्या किंमती काय आहेत याची माहिती घेऊ.

आजचा सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्यात. १०० ग्राम सोन्याची किंमत ६,९०,६०० रुपये इतकी आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,५३,२०० रुपये इतकी आहे. तर १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,६५,१०० रुपये इतकी आहे.

मुंबईतील दर

मुंबईत १८ कॅरेट ५,६३८ रुपये, २२ कॅरेट ६,८९१ आणि २४ कॅरेट ७,५१७ रुपये प्रति ग्राम दर आहे.

पुण्यातील सोन्याच्या किंमती

पुण्यात २२ कॅरेट ६,८९१, १८ कॅरेट ५,६३८ रुपये आणि २४ कॅरेट ७,५१७ रुपये प्रति ग्राम दर आहे.

चांदीच्या किंमती

आज चांदीच्या किंमतीत प्रति किलो १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काल चांदी ९६,५०० रुपये किलो होती. तर आज चांदी ९६,६०० रुपये प्रति किलो आहे. मुंबईसह पुण्याच चांदीच्या किंमती ९६,६०० रुपये प्रति किलो आहे.

Gold Silver Rate (21 May 2024)
Gold Silver Price Slips : सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com