ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या हाताचे ठसे उमटणे, चहा, कॉफी सांडणे आणि धूळ बसणे या कारणांमुळे सोफा कुशनवर डाग पडतात. हे डाग वेळीच स्वच्छ न केल्यास कायमचे बसतात.
डाग पडताच लगेच कोरड्या कपड्याने दाबा आणि डाग पडल्यावर चोळू नका यामुळे डाग खोलवर जात नाही.
धूळ आणि हलके डाग काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर किंवा कोरड्या ब्रशने सोफा स्वच्छ करा. यामुळे वरची धूळ निघून जाते आणि पुढची सफाई सोपी होते.
१ कप कोमट पाणी आणि १ चमचा लिक्विड डिशवॉश यांचे मिश्रण करून घ्या. यात कापड भिजवून हलके पुसून घ्या. असे केल्यास डाग हळूहळू फिकट होतात.
तेलकट किंवा चिकट डागांसाठी बेकिंग सोडा डागावर शिंपडा. १० ते १५ मिनिटांनी ब्रश किंवा कापडाने स्वच्छ करा.बेकिंग सोडा हा तेल शोषून घेण्यास मदत करतो.
थोडे व्हिनेगर आणि पाणी याचे मिश्रण बनवा. कापडाने हलके पुसल्यास चॉकलेटचे डाग निघून जातात.
पूर्ण सोफ्यावर बेकिंग सोडा शिंपडा. ३० मिनिटांनी व्हॅक्यूम करा. व्हॅक्यूम केल्यावर वास निघून जाऊन सोफा फ्रेश वाटतो.
सोफा आणि कुशनसाठी जास्त पाणी वापरू नका. तसेच कडक ब्रश वापरणे टाळा आणि उन्हात वाळत टाकू नका. अशाने सोफा आणि कुशन खराब होण्याची शक्यता असते.