Ather 450X Saam TV
लाईफस्टाईल

Electric Scooter : मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार, Ather 450X चा नवीन व्हेरिएंट लॉन्च; जाणून घ्या किंमत

Ather 450X : मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार, Ather 450X चा नवीन व्हेरिएंट लॉन्च

Satish Kengar

New Electric Scooter : प्रसिद्ध दुचाकी उत्पदक कंपनी Ather Energy ने आपल्या Ather 450X चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. या नवीन बेस व्हेरिएंटची किंमत 98,079 रुपये (नवी दिल्ली) आहे. यामध्ये कंपनीने अनेक नावीण फीचर्स दिले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

यातच जर तुम्ही प्रो पॅकसह Ather 450X खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती 1,28,443 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही किंमत या इलेक्ट्रिक स्कूटरच्या जुन्या किमतीपेक्षा 10,000 ते 15,000 रुपये कमी आहे.

Ather 450X चे दोन्ही प्रकार समान हार्डवेअरसह येतात. मात्र फीचर्स, चार्जर आणि वॉरंटीमध्ये हे दोन्ही वेगवेगळे आहेत. किंमत कमी करण्यासाठी Ather ने सध्याच्या स्कूटरची फीचर्स कमी केली आहेत, तरीही त्यात 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो.  (Latest Marathi News)

पण बेस व्हेरिएंटला ग्रेस्केल इंटरफेस मिळतो, तर प्रो पॅकला कलर डिस्प्ले मिळतो. यामध्ये राइड मोड, पार्क असिस्ट, हिल होल्ड असिस्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जीपीएस नेव्हिगेशन आणि लाईव्ह ट्रॅकिंग दिलेले नाही. (Latest Auto News in Marathi)

याचे बेस व्हेरिएंट देखील OTA अपडेटला सपोर्ट करत नाही. याशिवाय बेस व्हेरियंटमध्ये म्युझिक आणि कॉल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, गाइड-मी-होम लाईट, ऑटो इंडिकेटर ऑफ, रिमोट चार्ज मॉनिटरिंग, फास्ट चार्जिंग आदी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.

Ather Energy ने 450X सह प्रो पॅक देखील आणला आहे, ज्याची किंमत 30,000 रुपये आहे. याच्या मदतीने तुम्हाला पूर्ण लोडेड Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर मिळेल. ज्यामध्ये फास्ट चार्जिंग देखील समाविष्ट आहे. ही केवळ 5 तास 40 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.

तर Ather 450X चे बेस व्हेरिएंट चार्ज करण्यासाठी 15 तास 20 मिनिटे लागतात. यासह बेस व्हेरिएंटच्या ग्राहकांना एथरच्या फास्ट चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळत नाही. बेस व्हेरिएंटचे ग्राहक नंतर प्रो पॅकमध्ये अपग्रेड करू शकणार नाहीत.

450X चे बेस व्हेरिएंट 3.7 kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे, जी 6.4 kW पॉवर आणि 26 Nm टॉर्क जनरेट करते. याचा सर्वाधिक वेग 90 किमी/तास आहे आणि ही फक्त 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडू शकते.

दोन्ही प्रकारांची रेंज 146 किमी आहे. वॉरंटीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही प्रकारांना वाहन आणि चार्जरवर 3 वर्षे/30,000 किमी, बेस व्हेरिएंट बॅटरीवर 3 वर्षे/30,000 किमी आणि प्रो पॅकवर 5 वर्षे/60,000 किमीची वॉरंटी मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT