Citroen C3 Shine Launched : भन्नाट फीचर्ससह लॉन्च झाली Citroen C3 Shine, मारुती ब्रेझासह या कारला देणार टक्कर !

CitroenC3 Shine : Citroën कंपनीने आपली हॅचबॅक कार C3 ही जुलै 2022 मध्ये भारतात लॉन्च केली होती.
Citron C3 Shine
Citron C3 ShineSaam Tv
Published On

Citroen C3 Shine Features : Citroen कंपनीने आपली हॅचबॅक कार C3 ही जुलै 2022 मध्ये भारतात लॉन्च केली होती. ज्याची किंमत रु 5.71 लाख ते रु 8.06 लाख एक्स-शोरूम आहे. परंतु, या कार मध्ये वायपर, डिफॉगर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, रिअर कॅमेरा, आयआरव्हीएम यांसारखी काही मूलभूत गोष्टी कंपनीने दिल्या नव्हत्या

या कारच्या (Car) टॉप-एंड व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स आणि डिफॉगर देखील दिलेले नाहीत. आता कंपनीने या हॅचबॅकचे अपडेटेड व्हर्जन नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहे. टॉप व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, रियर पार्किंग कॅमेरा (Camera), डे/नाईट IRVM, 15 इंच डायमंड कट अॅलॉय व्हील, फॉग लाइट्स, रिअर वायपर आणि वॉशर, रिअर स्किड प्लेट्स, रिअर डीफॉगर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Citron C3 Shine
Cheapest Electric Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

याशिवाय, 'My Citroën Connect' अॅपद्वारे Citroën Connectivity 1.0 प्लॅन अंतर्गत 35 स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

1. फीचर्स

  • Citroen C3 दोन इंजिन पर्यायांसह ऑफर (Offer) केली आहे. प्रथम 1.2l तीन सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड युनिट्ससह, जे 82hp पॉवर आणि 115Nm टॉर्क देते.

  • जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

  • दुसरे 1.2l 3 सिलेंडर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन जे 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क देते. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

  • याशिवाय ईएसपी, हिल होल्ड, टीपीएमएस आणि इंजिन स्टार्ट स्टॉप सारखे फीचर्सही नवीन C3 शाइनमध्ये देण्यात आले आहेत.

  • यामध्ये दिलेली दोन्ही इंजिने BS6 फेज II नुसार आहेत. कंपनीने या कारच्या मायलेजसाठी 19.3 किमी/लीचा दावा केला आहे.

Citron C3 Shine
Upcoming Cars : Hyundai भारतात लॉन्च करणार छोटी SUV, Tata Punch ला देणार टक्कर

2. किंमत (Price)

कंपनीने त्याचा Citroën C3 शाइन व्हेरिएंट 7.60 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून ते 7.87 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केला आहे.

3. या कंपन्यांना देणार टक्कर

Citroën C3 शाइनशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये टाटा पंच, मारुती ब्रेझा, मारुती बलेनो, मारुती स्विफ्ट आणि निसान मॅग्नाइट सारख्या वाहनांचा समावेश असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com