Banana Leaf Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Banana Leaf Benefits: केळीच्या पानांवर जेवून तर पाहा; त्वचा होईल तजेलदार आणि मुलायम

Kelichya Panache Fayde: आजकाल सर्वजण स्टील किंवा काचेच्या ताटामध्ये जेवतात. पण चांगल्या आरोग्यासाठी केळीच्या पानामध्ये जेवण्याची गरज आहे. जाणून घेऊयात केळीच्या पानात जेवण्याचे फायदे...

Shreya Maskar

हिंदू धर्मामध्ये केळीच्या पानाला खूप महत्त्व आहे. केळीचे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावल्यास शुभ मानले जाते. पूर्वी केळीच्या पानावर जेवण जेवले जात होते. पण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोक स्टील किंवा काचेच्या ताटामध्ये जेवतात. फक्त पूजा किंवा एखाद्या प्रसंगादरम्यान आपण केळीचे पान जेवण्यासाठी वापरतो. पण रोज केळीच्या पानात जेवण केल्यामुळे आरोग्यास असंख्य फायदे मिळतात.

केळीच्या पानाचे पोषक घटक

केळीच्या पानामध्ये फायबर , व्हिटामिन्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते. तसेच केळीच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिडी, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पॉलिफेनॉल असते. केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्याने केळीच्या पानातील पोषक घटक जेवणामध्ये उतरतात.

आजारांपासून संरक्षण

केळीच्या पानावर जेवल्यास रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. केळीच्या पानावर जेवण करण्याआधी त्यांची नीट स्वच्छता करणे महत्वाचे आहे.

त्वचेचे आरोग्य

केळीच्या पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स जेवणावाटे पोटात जातात. त्यामुळे त्वचा दीर्घकाळ तजेलदार राहते. त्वचेच्या समस्या दूर करण्यास केळीचे पान मदत करते. चेहऱ्यावरील पुरळ, काळे डाग, मुरुमांची संख्या कमी होते. त्वचेला कोणती अ‍ॅलर्जी झाली असल्यास केळीचे पान रामबाण उपाय आहे. केळीचे पान चेहऱ्यावरील लाल डाग, खाज दूर करते. तुम्ही केळीच्या पानावर खोबरेल तेल लावून ते पान चेहऱ्यावर फिरवू शकता. यामुळे त्वचा मुलायम राहते.

पोटाचे आरोग्य

केळीच्या पानावर जेवण केल्याने पोटाचे आजार बरे होतात. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताप-सर्दी, जुलाबाच्या त्रास होत असल्यास केळीच्या पानात जेवणे फायदेशीर राहते. तसेच केळीच्या रसातील घटक बद्धकोष्ठतेची समस्येवर आराम देतात. तुम्हाल अशक्तपणा जाणवत असल्यास केळीच्या पानावर जेवण करा.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT