सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अनेकजण घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडत आहे. अनेक व्यक्ती पर्यटनासाठी धबधब्यावर जात आहे तर कोणी महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यावर जात असतात. त्यात सोशल मीडियावर एका कलावंतीण दुर्गचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या मनात धडकी नक्कीच बसेल.
कलावंतीण दुर्ग जवळपास ५०० मीटर म्हणजेच २३०० फूट उंच आहे. या किल्ल्यावर चढणे खूप जोखमीचे काम आहे. या किल्ल्यावर चढताना प्रत्येकाने विशेष काळजी घ्यायची असते. किल्ल्याच्या एका भागात तुम्हाला पायऱ्याने प्रवास करावा लागतो. या पायऱ्या जवळपास ९०-१०० डिग्री कोनात असल्याचे दिसत आहे. या भागातून एक मुलगी आपला ट्रेक करताना दिसत आहे. ती मुलगी संपूर्णपणे पावसाने भिजलेली आहे. भर पावसात कलांवतीण दुर्गावर चढतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या किल्ल्यावरुन खाली जाताना या मुलीचे हात- पाय थरथरताना दिसत आहे. गडावरुन बघितल्यावर खाली खोल दरी दिसत आहे. खोल दरीचे हे हृश्य निसर्गरम्य आहेच पण त्याचसोबत काळजाला धडकी भरवणारे आहे. पावसाळ्यात कलावंतीण दुर्गावर अनेक ट्रेकर्स ट्रेक करण्यासाठी येतात.
महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाण पावसाळ्यात सुंदर अशा निसर्गाने सजून जाते. यात कलावंतीण दुर्गाचादेखील समावेश होतो. कलावंतीण दुर्ग किल्ला हा निसर्गाने नटलेला आहे. या किल्ल्यावर पावसाळ्यात प्रचंड गर्दी होते. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पनवेल स्टेशनला जा. त्यानंतर तुम्ही ठाकूरवाडीपर्यंत जाणारी बस किंवा रिक्षा पकडा. ठाकुरवाडीला पोहचल्यावर तुम्ही प्रबळमाचीवर ट्रेक करा. प्रबळमाचीवर तुम्हाला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.