Banana Crop
Banana CropSaam tv

Amravati News : वादळी वाऱ्याने केळीचे पीक उद्ध्वस्त; अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा फटका

Amravati News : रोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत असून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला
Published on

अमर घटारे 

अमरावती : राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या दरम्यान अमरावती जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Banana Crop
Water Scarcity : एक किलोमीटरचा घाट रस्ता चढून आणावे लागते पाणी; खैरखेडा येथे पाणीटंचाईचे भीषण चित्र

मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी (Rain) पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. रोज वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस होत असून अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वर जोरदार असल्यामुळे केळीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतात परिपक्व झालेल्या केळीची झाडे मोडून पडल्याने जमीनदोस्त झाली आहेत. 

Banana Crop
Beed ACB : लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या घरात सापडले लाखोंचे घबाड; दागिनेही केले जप्त

२५ हेक्टरवर नुकसान 
कारला व आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. तर काही दिवसावर तोडणीस आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. २५ हेक्टरमधील (Banana Crop) केळी पिकाचे नुकसान झाले. शासनाने तातडीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com