Beed ACB
Beed ACBSaam tv

Beed ACB : लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या घरात सापडले लाखोंचे घबाड; दागिनेही केले जप्त

Beed News : तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याचा परवानगीसाठी २८ हजाराची लाच घेतांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे
Published on

बीड : बीड जिल्ह्यात एसीबीकडून दोन वेगवेगळ्या कारवाया झाल्या. यातील एका कारवाईत माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे घबाड आढळून आले आहे. यात रोख रकमेसह काही सोन्या- चांदीच्या वस्तू देखील आहेत. 

Beed ACB
Beed News : एक कोटी लाचेची मागणी; फरार लाचखोर पोलीस निरीक्षक एसीबीला शरण

बीडमध्ये एसीबीच्या कारवाईने भ्रष्टाचाराचे धाबे दणाणले आहे. बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभाग परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या अधिकाऱ्याला तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याचा परवानगीसाठी २८ हजाराची लाच घेतांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याच्या अंबाजोगाईत येथील किरायाच्या घरी कार्यकारी अभियंता सलगरकर व पंचा समक्ष घर झडती घेतली.  

Beed ACB
Water Scarcity : एक किलोमीटरचा घाट रस्ता चढून आणावे लागते पाणी; खैरखेडा येथे पाणीटंचाईचे भीषण चित्र

घराच्या झडतीमध्ये ११ लाख ७८ हजार ४६५ रुपये रोख, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये, ३ किलो ४०० ग्रॅम चांदी ज्याची किंमत अंदाजे २ लाख ७२ हजार रुपये आहे. हा सर्व लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com